वेगवेगळ्या आंदोलनामुळे प्रसिद्ध असलेल्या मंगेश साबळे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा भाजपाच्या उमेदवाराने पराभव केला. या पराभवातून बाहेर पडत साबळे यांनी दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने आणि ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याच्या निषेधार्थ मंगेश साबळे यांनी आज अनोखे आंदोलन केले. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर थेट 'गोधडी' घेऊन ठिय्या मांडत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
Mumbai: मुंबईत भीषण दुर्घटना! भायखळ्यात १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; ५ जण गंभीर जखमी
मंगेश साबळे ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या सर्कलमधील अनेक गावांतील ट्रान्सफॉर्मर गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडले आहेत. यामुळे शेतीचे सिंचन आणि नागरिकांच्या दैनंदिन वापरावर मोठा परिणाम झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणकडून दाद मिळत नसल्याने, संतप्त झालेल्या साबळे यांनी आज थेट कार्यालयात गेले.
निवडणुकीपूर्वीचा शब्द पाळला
यावेळी माध्यमांशी बोलताना मंगेश साबळे म्हणाले, "माझ्या सर्कलमधील नागरिक आणि शेतकरी त्रस्त होऊन माझ्याकडे येत आहेत. निवडणुकीपूर्वी मी त्यांना त्यांची कामे मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. लोकांच्या समस्या सुटत नसल्याने मला आज हे गोधडी आंदोलन करावे लागले. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही."
प्रशासनाची नमती भूमिका
साबळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. आंदोलनानंतर उपकार्यकारी अभियंत्यांनी साबळे यांच्याशी चर्चा केली. पुढील ४८ तासांत संबंधित भागाचे सर्वेक्षण करून तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील आणि बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर बदलले जातील, असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
प्रशासनाच्या या आश्वासनानंतर मंगेश साबळे यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले, मात्र ४८ तासांत काम न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
Web Summary : Despite election loss, Mangesh Sable launched a unique protest against frequent power cuts and transformer unavailability, garnering official response. He staged a 'Ghodadi' protest, prompting officials to promise resolution within 48 hours, averting further action.
Web Summary : चुनाव हारने के बावजूद, मंगेश साबले ने बार-बार बिजली कटौती और ट्रांसफार्मर की अनुपलब्धता के खिलाफ अनूठा विरोध प्रदर्शन शुरू किया, जिससे अधिकारियों ने प्रतिक्रिया दी। उन्होंने 'गोदड़ी' विरोध प्रदर्शन किया, जिससे अधिकारियों को 48 घंटों के भीतर समाधान का वादा करने के लिए प्रेरित किया, जिससे आगे की कार्रवाई टल गई।