शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मांडवीचे चार पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

By admin | Updated: May 18, 2014 01:25 IST

मांडवी : आरोपीने रात्रीला सोबतचे पोलिस खाण्या-पिण्यात गुंतल्याचे पाहून हातकडीतून सुटका करुन पोबारा केल्याची घटना पिंपळगाव फाटा येथे घडली.

 मांडवी : बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या आरोपीने रात्रीला सोबतचे पोलिस खाण्या-पिण्यात गुंतल्याचे पाहून हातकडीतून सुटका करुन पोबारा केल्याची घटना पिंपळगाव फाटा येथे घडली. या घटनेला जबाबदार धरुन संबंधित चार पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले, अशी माहिती सपोनि व्ही. व्ही. खिल्लारे यांनी दिली. येथील दत्तनगरमध्ये राहणार्‍या निलेश विजय राठोड यांनी आदिवासी प्रवर्गात मोडणार्‍या एका मुलीला फूस लावून पळवून नेले. त्याची रितसर तक्रार पीडित मुलीच्या कुुटुंबाने ७ जुलै २०१३ ला मांडवी पोलिस ठाण्यात दिली. तेव्हापासून हा आरोपी फरार होता. गेल्या दहा महिन्यांपासून तालुकास्तरावरील विशेष पोलिस पथकांनी तपासाची दिशा ठरवून भ्रमणध्वनीच्या मनोरा संकेतावरुन आदिलाबाद जिल्ह्यातील कजरला या गावात सापळा रचून १३ मे रोजी आरोपीला पकडले. पुढील कार्यवाहीसाठी सदर आरोपीला मांडवी पोलिसाकडे सोपविले. त्यांनी तपास प्रक्रिया चालू केली. १५ मे रोजी किनवटवरुन मांडवीकडे परत येत असताना पिंपळगाव फाटा येथे नेहमी प्रमाणे आरोपीला घेवून हे पोलिस खाण्या-पिण्यासाठी येथे थांबले. हळूहळू पार्टीचा रंग चढत गेला अन् हे हेरलेल्या त्या चतूर आरोपीने आपला डाव साधला आणि अंधाराचा फायदा घेत शेत शिवारातून पसार झाला. आपल्याला गुंगारा देऊन आरोपीने पलायन केल्याचे समजताच जमादार आनंद नरवाडे, रामदास ढोले, संजय रांजणे, गजानन धुर्वे यांचे अवसान गळाले आणि हात हलवत ठाण्यात परतले. ही घटना सर्वत्र पसरली. या घटनेला जबाबदार धरुन चारही जणांना निलंबित केले आहे. (वार्ताहर)