शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

चिकलठाण्यात मनपा बॅकफुटवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:36 PM

चिकलठाण्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र सुरू होईल, असे खोटे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकºयांनी कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत एकही कचºयाचे वाहन जाऊ दिले नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन : चौथ्या दिवशीही कचरा टाकण्यास विरोध

औरंगाबाद : चिकलठाण्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र सुरू होईल, असे खोटे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकºयांनी कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत एकही कचºयाचे वाहन जाऊ दिले नाही. शेतकºयांच्या आंदोलनामुळे मागील चार दिवसांमध्ये मनपा चांगलीच बॅकफुटवर आली आहे. जुन्या हजारो मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केल्याशिवाय नवीन कचरा येऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.नारेगाव येथील कचरा डेपोविरोधात परिसरातील ग्रामस्थांनी फेबु्रवारी २०१८ मध्ये जोरदार आंदोलन केल्यानंतर शहराचा कचरा प्रश्न राज्यभर गाजला. विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरताच राज्य शासनाने मनपाला तब्बल ९१ कोटींचा निधी मंजूर केला. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी चार ठिकाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा प्रक्रिया, कंत्राटदार निश्चित करणे, शेड उभारणी या कामांमध्ये वर्ष गेले. अद्याप कचºयावर प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव व कांचनवाडी या चार ठिकाणी तात्पुरते पत्र्याचे शेड उभारून त्यात कचरा साठविण्यात आला. नारेगावप्रमाणे मनपाने कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार करून ठेवले आहेत. भविष्यात या कचºयावर कधी प्रक्रिया करण्यात येईल, हे सुद्धा मनपा ठामपणे सांगू शकत नाही.चिकलठाणा पंचक्रोशीतील शेतकºयांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प त्वरित उभारण्यात यावा या मागणीसाठी मनपाकडे पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी प्रशासनातर्फे चार महिन्यांमध्ये प्रकल्प सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले. सहा महिने उलटले तरी प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही, त्यामुळे शेतकरी बाळासाहेब दहीहंडे, दिगंबर कावडे, रमेश नवपुते, कारभारी गोरे, संजय गोटे, दिगंबर कावडे, दिलीप रेठे यांच्यासह शेतकºयांनी शुक्रवारपासून कचरा टाकण्यास विरोध सुरू केला. जुन्या कचºयावर प्रक्रिया झाल्याशिवाय एकही नवीन वाहन आणायचे नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. सोमवारी चौथ्या दिवशीही शेतकºयांनी आंदोलन सुरूच ठेवले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न