शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

इंग्रजीच्या पेपरला केंद्र संचालकानेच पुरविल्या कॉप्या; ६ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 20:28 IST

सामूहिक कॉपीचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे वाळूज परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देगजानन महाविद्यालय केंद्रातील प्रकार

वाळूज महानगर : बारावी परीक्षेत रांजणगावातील गजानन कनिष्ठ महविद्यालय या परीक्षा केंद्रात कॉपी पुरविताना केंद्र संचालकासह ६ जणांविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामूहिक कॉपीचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे वाळूज परिसरात खळबळ उडाली आहे.

इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. रांजणगाव येथील श्री गजानन कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर ४१७ परीक्षार्थी असून, पहिल्या दिवशी इंग्रजी या विषयाचा पेपर  होता. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास या केंद्रातील प्रयोगशाळेच्या रूममध्ये काही शिक्षक बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे शोधत असल्याचे पोलीस कर्मचारी विलास घनवटे व एसपीओ निमोने यांना दिसून आले. घनवटे यांनी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना या प्रकाराची माहिती दिली.

पोलीस निरीक्षक सावंत, उपनिरीक्षक प्रीती फड, पोहेकॉ. रामदास गाडेकर आदींच्या पथकाने या परीक्षा केंद्राची पाहणी केली असता त्यांना प्रयोगशाळेच्या रूममध्ये काही शिक्षक प्रश्नपत्रिकेतील उत्तरे शोधत असल्याचे दिसले. यानंतर पोलीस पथकाने या सर्व शिक्षकांना ताब्यात घेत शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण यांना माहिती दिली. यानंतर उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी या परीक्षा केंद्राची पाहणी केली. यात गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेवर शिक्षकांनी विविध प्रश्नांची उत्तरे लिहूून ठेवल्याचे आढळून आले. 

परीक्षा केंद्रातील कोणा एका विद्यार्थ्याला कॉपी पुरविण्यासाठी संगनमत करून बारावी बोर्ड परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे उत्तर लिहिताना हे ६ शिक्षक आढळून आले आहेत. उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या व्यवहारांना प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ५ व ७ प्रमाणे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

प्रश्नपत्रिकेवर उत्तरे लिहिणारे हेच ते ६ जणपोलिसांनी केंद्र संचालक रत्नमाला कदम (महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय, वाळूज), प्रशांत गोरख मरकड (महाराष्ट्र पब्लिक स्कूल, वाळूज), शरणाप्पा साधू रसाळकर (शिक्षक, क्राईस्ट चर्च स्कूल, छावणी), कल्याण रघुनाथ कुलकर्णी (गजानन विद्यालय, रांजणगाव), लालेश हिराला महाजन (पी.एम. ज्ञानमंदिर, रांजणगाव) व अक्षय प्रकाश आरके (प्रयोगशाळा सहायक, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय, वाळूज) या ६ जणांना ताब्यात घेतले आहे.

छावणीतील नगरसेवक पुत्रास कॉपी देण्यासाठी प्रतापवाळूज येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयात छावणी नगर परिषदेच्या एका नगरसेवकाचा मुलगा बारावीचे शिक्षण घेत होता. या नगरसेवकाच्या मुलाकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र असून, त्याच्यासाठी केंद्रातील खालच्या खोलीमध्ये विशेष व्यवस्था केली होती. या नगरसेवकाने केंद्र संचालकाच्या मदतीने काही शिक्षकांना हाताशी धरून हा कॉपीचा प्रकार केल्याची चर्चा वाळूज महानगरात सुरू आहे.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाStudentविद्यार्थी