माजलगावात राकाँ- भाजपात ‘स्ट्रेट फाईट’

By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-13T23:52:28+5:302014-06-14T01:19:29+5:30

पुरुषोत्तम करवा, माजलगाव माजलगाव मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे़ लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या उलथापालथीनंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत़

MAJALGAAT RAKEN - BJP 'STREET Fight' | माजलगावात राकाँ- भाजपात ‘स्ट्रेट फाईट’

माजलगावात राकाँ- भाजपात ‘स्ट्रेट फाईट’

पुरुषोत्तम करवा, माजलगाव
माजलगाव मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे़ लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या उलथापालथीनंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत़ बंडाळी रोखण्याचे आव्हान प्रमुख पक्षांपुढे राहणार आहे़ पक्ष तितके नेते अशी स्थिती असली तरी येत्या विधानसभा निवडणुकीत येथे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपामध्येच सरळ लढत होईल़
प्रकाश सोळंके हे सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत़ दोनदा भाजपाकडून तर एकदा राष्ट्रवादीकडून ते विधानसभेत पोहोचले़ सध्या ते राष्ट्रवादीच्या आश्रयाला आहेत़ यावेळी देखील तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील़ लोकसभा निवडणुकीत माजी आ़ राधाकृष्ण होके पाटील, भारिपचे बाबूराव पोटभरे यांनी गोपीनाथराव मुंडेंच्या मागे उभे राहणे पसंत केले़ मुंडेंना तब्बल ३५ हजारांचे मताधिक्य मिळाले़
त्यामुळे विधानसभेत हे मताधिक्य कमी होते की आहे तसेच राहते? यावरच जय- पराजय अवलंबून आहे़भाजपात आऱ टी़ देशमुख, भाई गंगाभीषण थावरे, माजी आ़ राधाकृष्ण होेके पाटील, डॉ़ प्रकाश आनंदगावकर, अरुण राऊत अशी फौज आहे़ देशमुख, थावरे यांच्यात उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु आहे़ ऐनवेळी बाबूराव पोटभरे हे देखील उमेदवारीवर दावा करु शकतात़ त्यामुळे पक्ष कोणाला संधी देतो? याची सर्वांना उत्कंठा आहे़ भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जाण्याने माजलगावातील नेत्यांचा आधार हरवला आहे़ अशा स्थितीत उमेदवारीसाठीही झगडावे लागेल अशी शक्यता आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीत आ़ प्रकाश सोळंके, मोहनराव जगताप, सहाल चाऊस, जिल्हाध्यक्ष अशोक डक, रमेश आडसकर या मातब्बरांचा समावेश आहे़ मात्र, या नेत्यांमधून विस्तवही जात नाही़ त्यामुळे बंडखोरीचा सामना भाजपाबरोबर, राष्ट्रवादीलाही करावा लागेल, अशीच स्थिती आहे़
संघटनांची भूमिका महत्त्वाची
माजलगावात सामाजिक संघटनाही अस्तित्व टिकवून आहेत़ बाबूराव पोटभरे यांनी भारिपला रामराम ठोकून बहुजन विकास मोर्चाची मुहूर्तमेढ रोवली़ त्यांचा मतदारसंघात प्रभाव आहे़ डॉ़ उद्धव नाईकनवरे हा नवखा तरुण ‘आव्हान’ संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांसाठी झगडतो आहे़ माजलगाव धरणातील मच्छीमारांसाठी त्यांनी मोठे आंदोलन उभे केलेले आहे़ विजयाचे वर्तूळ पूर्ण करण्यासाठी या संघटनांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे़
राष्ट्रवादीप्रकाश सोळंके ८६,९४३
भाजपाआर.टी. देशमुख ७९,०३४
शेकापभाई गंगाभीषण थावरे १०,०७७
इच्छुकांचे नाव पक्ष
प्रकाश सोळंकेराकाँ.
सहाल चाऊसराकाँ
आर.टी. देशमुखभाजपा
भाई थावरेभाजपा
लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांना ३४,२३७ एवढे मताधिक्य

Web Title: MAJALGAAT RAKEN - BJP 'STREET Fight'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.