कार्यकर्ता पक्षाच्या ताकदीचा मुख्य आधार आहे : केंद्रीय मंत्री दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:00+5:302020-12-17T04:32:00+5:30
प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी म्हणाले की, अन्य पक्षाप्रमाणे भाजपामध्ये घराणेशाही नाही. राज्यात शहर, गावपातळीवर सुरू असलेल्या शासनाच्या योजना केंद्र ...

कार्यकर्ता पक्षाच्या ताकदीचा मुख्य आधार आहे : केंद्रीय मंत्री दानवे
प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी म्हणाले की, अन्य पक्षाप्रमाणे भाजपामध्ये घराणेशाही नाही.
राज्यात शहर, गावपातळीवर सुरू असलेल्या शासनाच्या योजना केंद्र सरकार व मागील राज्य सरकारने यशस्वी राबवल्या आहेत. या योजना शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपण सर्व कार्यकर्त्यांची आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय औताडे, भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, माजी महापौर बापू घडामोडे, किशोर धनायत यांनी मार्गदर्शन केले. माजी आमदार सांडु पाटील लोखंडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, अशोक गरुड, सुनील मिरकर, श्रीरंग साळवे, गजानन राऊत, गणेश बनकर, अशोक तायडे, कमलेश कटारिया, दादाराव आळणे, अनिल खरात, विलास पाटील, सुधाकर सोनवणे, किशोर गवळे, संजय डमाळे यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
फोटो आहे : सिल्लोड शहरात पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व उपस्थित जनसमुदाय.