शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

माहुरगडाचे रुपडे पालटणार

By admin | Updated: July 17, 2014 00:22 IST

श्रीक्षेत्र माहूर : मंदीर समितीने मंदिर परिसराच्या भोवती संरक्षित भिंत (परकोट) बांधण्याचे काम हाती घेतले आहे़

श्रीक्षेत्र माहूर : मंदीर समितीने मंदिर परिसराच्या भोवती संरक्षित भिंत (परकोट) बांधण्याचे काम हाती घेतले आहे़ सोबतच श्री रेणुका मातेच्या नित्यकर्माशी संबंधित असलेल्या व रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पवित्र उंबरझरा कुंडाच्या पुनरुज्जीवनाचे कामही हाती घेण्यात आले आहे़श्री रेणुकामाता मंदिरावर नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीस सुधारणा करण्याचे अधिकार असल्याने समितीने भाविकांच्या सुविधा, सुरक्षा वाढविण्यावर भर दिला़ सर्वप्रथम श्री रेणुका मातेचे आॅनलाईन दर्शन जगभरातील भाविकांना व्हावे व देणग्याही आॅनलाईन देता याव्यात यासाठी मातेच्या नावाची वेबसाईट सुरू केली़ मंदिर प्रशासनाकडून श्री रेणुका मातेच्या नित्या कर्माशी संबंधित प्रत्येक ठिकाणाचा यथोचित विकास व्हावा व भाविकांना दर्शन सुलभ होवून मन प्रसन्न व्हावे या हेतुने प्रशासनाने योजना आखली असून त्याचाच एक भाग म्हणून उंबरझरा कुंडाच्या पुनरूज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले असून पायी जाणाऱ्या दिंड्यातील भाविकांनाही या कुंडातील पाण्याचा लाभ घेता येणार आहे़मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी आंबा, चिंच, कडुनिंग, अशोका व इतर प्रकारची १०४० झाडे खरेदी करण्यात आली असून लवकरच परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे़ भाविकांना आरोग्याबाबत कुठलीही समस्या उद्भवल्यास त्यांना तत्काळ, लगेच गढावरच सुविधा मिळाव्या या हेतुने संस्थानवर मिनी रुग्णालय उभारण्यात आले असून येथे तज्ज्ञ डॉक्टर्स परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ अतिदक्षता विभागाचे उपचार मिळावे, यासाठी सुसज्ज अशी अ‍ॅम्बुलन्स खरेदी करण्यात आली असून ती भाविकांच्या सुविधेत २४ तास गढावर सज्ज राहणार आहे़ आणखी सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ (वार्ताहर)संरक्षक भिंत, परकोट भिंती बांधकाम समितीकडून शेगाव-शिर्डी देवस्थानाच्या धर्तीवर भाविकांसाठी अनेक सुविधा प्रस्तावित असून थोड्याच दिवसात श्री रेणुकामाता संस्थानकडून भाविक भक्तांना सुविधा वाढाव्या या हेतुने अतिसुसज्ज अशी भक्त निवासाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे कार्यालय अधीक्षक पी़डी़ चव्हाण यांनी दिली़