शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरमध्ये आता 'महिंद्रा'चा धमाका! शेंद्रा एमआयडीसीमध्ये १५० एकरवर होणार प्रकल्प?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:42 IST

जयपूर एमआयडीसीमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचा भव्य प्रकल्प; १५० एकर जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

छत्रपती संभाजीनगर: अतिरिक्त शेंद्रा अर्थात जयपूर एमआयडीसीमध्ये आता ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आपला भव्य प्रकल्प साकारणार आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतीच याठिकाणी १५० एकर जागेची पाहणी केली असून, ही जमीन कंपनीला पसंत पडल्याची माहिती एमआयडीसीच्या सूत्रांनी दिली आहे.

ऑरिकनंतर जयपूरला पसंतीबिडकीन आणि शेंद्रा ऑरिकमध्ये टोयोटा, जेएसडब्ल्यू यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनानंतर औद्योगिक भूखंडांची मागणी वाढली आहे. मात्र, ऑरिकमध्ये सध्या मोठा भूखंड शिल्लक नसल्याने, उद्योग विभागाने महिंद्रा कंपनीसमोर जयपूर एमआयडीसीचा पर्याय ठेवला होता. महिंद्रा कंपनीला एकूण ३०० एकर जागेची आवश्यकता असून, त्यापैकी १५० एकर ऑरिकमध्ये आणि उर्वरित १५० एकर जयपूरमध्ये देण्याचे नियोजन आहे.

लवकरच होणार सामंजस्य करारमहिंद्रा ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी जमिनीची पाहणी केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जरी अद्याप ५ टक्के रक्कम एमआयडीसीकडे भरली नसली, तरी येत्या काही महिन्यांत राज्य शासनाच्या उद्योग विभागासोबत या प्रकल्पासाठी अधिकृत सामंजस्य करार (MoU) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahindra's Big Move: Project Likely in Chhatrapati Sambhajinagar's Shendra MIDC

Web Summary : Mahindra & Mahindra eyes 150 acres in Shendra MIDC, Chhatrapati Sambhajinagar, for a major project. After positive site visits, an MoU with the state government is expected soon. The investment promises significant job creation for local youth.
टॅग्स :Shendra MIDCशेंद्रा एमआयडीसीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMahindraमहिंद्रा