महावितरणचे अधिकारी अद्याप झोपेतच!

By Admin | Updated: November 26, 2014 01:08 IST2014-11-26T00:32:28+5:302014-11-26T01:08:14+5:30

जालना : शहरातील नवीन जालना भागातही अनेक ठिकाणी विद्युत तारांवर आकडे टाकून सर्रासपणे वीज चोरी करण्यात येत असल्याचा प्रकार मंगळवारी निदर्शनास आला.

Mahavitaran's officer still sleepy! | महावितरणचे अधिकारी अद्याप झोपेतच!

महावितरणचे अधिकारी अद्याप झोपेतच!


जालना : शहरातील नवीन जालना भागातही अनेक ठिकाणी विद्युत तारांवर आकडे टाकून सर्रासपणे वीज चोरी करण्यात येत असल्याचा प्रकार मंगळवारी निदर्शनास आला. कन्हैय्यानगर भागात तर वीज चोरी करणाऱ्या घरांच्या रांगाच आढळून आल्या. काही उच्चभू्र घरांमध्येही वीज चोरी होत असल्याचे धक्कादायक प्रकार आढळून आले.
‘लोकमत’ च्या हॅलो जालना अंकातून मंगळवारी जुना जालन्यातील वीज चोरीसंदर्भातील ‘स्टींग आॅपरेशन’ चे वृत्त प्रकाशित होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ज्या ठिकाणी आकडे आहेत, ते कायम होते. सायंकाळपर्यंत एकाही ठिकाणी छापा मारलेला नव्हता. महावितरणचे भरारी पथक आजही गायब होते.
लोकमत चमूने सकाळी ११ वाजता दर्गावेस भागास भेट दिली. तेथे दोन-तीन व्यावसायिकांनीही तारांवर आकडे टाकलेले होते. लोधी मोहल्ला, मंगळबाजार, रामनगर, गांधीनगर, पेन्शनपूरा या भागात अनेक ठिकाणी घरातून तारांवर आकडे टाकण्यात आलेले होते. हा प्रकार अनेक दिवसांपासून होत असल्याचे या भागातील काही नागरिकांनी सांगितले.वीज चोरीमुळे महावितरणचे दरमहा लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जात आहे. रामनगर, संभाजीनगर, गांधीनगर, कन्हैय्यानगर, पेन्शनपुरा या भागात काही दुमजली इमारतींमध्येही वीज चोरी होत असल्याचे आढळून आले. (समाप्त)
वीज वितरण कंपनीचे काही अधिकारी व बहुतांश कर्मचारी शहरातच राहतात. उघडपणे होणारी ही वीज चोरी त्यांच्या निदर्शनास येत नसेल तर नवलच म्हणावे लागेल. एकीकडे सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत असताना दुसरीकडे कानाडोळा कशासाठी ? असा संतप्त सवाल काही वीज ग्राहकांनी केला.
४मीटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीकडून अनेकवेळा रिडींग न घेता अंदाजित बिले दिली जातात. एखाद्या वेळी मग रिडिंगनुसार बिल दिले जाते. परंतु त्यामुळे वीज ग्राहकांचे दरमहा खर्चाचे बजेट कोलमडते. या बाबीकडे का लक्ष दिले जात नाही, असा सवालही वीज ग्राहकांमधून होत आहे.

Web Title: Mahavitaran's officer still sleepy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.