महावितरण, श्रेयस संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:11 IST2017-12-04T23:09:48+5:302017-12-04T23:11:05+5:30
एमजीएम क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरूअसलेल्या एमजीएम टी २0 क्रिकेट स्पर्धेत महावितरण संघाने लीप फास्टनर संघाचा पराभव केला. दुसºया सामन्यात श्रेयस इलेव्हन संघाने बार्शी येथील एमसीसी संघावर विजय मिळवला. इनायत अली आणि माजीद खान आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

महावितरण, श्रेयस संघ विजयी
औरंगाबाद : एमजीएम क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरूअसलेल्या एमजीएम टी २0 क्रिकेट स्पर्धेत महावितरण संघाने लीप फास्टनर संघाचा पराभव केला. दुसºया सामन्यात श्रेयस इलेव्हन संघाने बार्शी येथील एमसीसी संघावर विजय मिळवला. इनायत अली आणि माजीद खान आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
पहिल्या सामन्यात महावितरण संघाने २0 षटकांत २ बाद १४३ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून इनायत अली याने ३ चौकार, ३ षटकारांसह नाबाद ६७ व सचिन लव्हेरा याने २५ चेंडूंत ४0 धावांची झटपट खेळी केली. लीप फास्टनर संघाकडून राजू मदन व विक्रम चौधरी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात लीप फास्टनर संघ ३ बाद १२६ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून राजू मदन याने एकाकी झुंज देत नाबाद ६३ व राहुल पाटीलने ३५ धावा केल्या. महावितरणकडून हरमितसिंग रागी, इनायत अली व भास्कर विजय यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसºया सामन्यात बार्शी येथील एमसीसी संघ ३0 धावांत ढेपाळला. श्रेयस इलेव्हन संघाकडून माजीद खान याने ६ धावांत ६ गडी बाद केले. मुस्तफा शहा याने १ धावेत ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात श्रेयस इलेव्हनने विजयी लक्ष्य ३.३ षटकांत १ गडी गमावत ३३ धावा करीत गाठले. त्यांच्याकडून युसूफ पठाण नाबाद २४ धावा केल्या. उद्या सकाळी एमजीएम विरुद्ध नेरळकर अकॅडमी आणि दुपारी एमसीसी बार्शी वि. यंग इलेव्हन अ यांच्यात सामने होणार असल्याचे एमजीएमतर्फे सागर शेवाळे यांनी कळवले आहे.