भिडे वाड्याच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरातही महात्मा फुले यांचे स्मारक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:13 IST2025-04-12T16:12:46+5:302025-04-12T16:13:14+5:30
छत्रपती संभाजीनगर : भिडे वाड्याच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरात महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन राज्याचे ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे ...

भिडे वाड्याच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरातही महात्मा फुले यांचे स्मारक
छत्रपती संभाजीनगर : भिडे वाड्याच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरात महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन राज्याचे ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी येथे दिले. फुले यांच्या जयंतीनिमित्त औरंगपुरा येथील सर्वपक्षीय अभिवादन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार विक्रम काळे, आमदार संजय केणेकर, रामभाऊ पेरकर, माजी नगरसेवक अनिल मकरिये, जयराम साळुंके, शारदा कोथिंबिरे, रोहिणी काळे, कृष्णा डोणगावकर, शालिनी बुंधे, संजय खरात, राजेभाऊ जंजाळ, राजू वैद्य, अशोक दामले, जालिंदर शेंडगे, शिवाजी दांडगे, विवेक राठोड, संजय बोराडे, दत्ता भांगे, तसेच समितीचे संस्थापक अध्यक्ष विशाल पुंड, अध्यक्ष शैलेश काळे, कार्याध्यक्ष नितीन पाटील, कोषाध्यक्ष आसाराम वीरकर, सरचिटणीस अशोक गोरे, धीरज केंद्रे, गोपी इटके, पंडित कांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सावे यांनी यावेळी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणास्थान, गुरू असलेले महात्मा फुले हे शिक्षणाच्या क्षेत्रातील खरे क्रांतिकारक होते. त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली आणि सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला." सरकारने फुलेवाडा व भिडेवाड्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची व "महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी विधानसभेत एकमुखाने विधेयक पारित करण्यात आले आहे," अशी माहितीही त्यांनी दिली.