मराठवाड्यास महात्मा फुलेंचा पदस्पर्श; औरंगाबाद ते पैठण रस्ता पहिल्यांदा बांधला जोतिबांनी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:04 PM2022-04-11T12:04:26+5:302022-04-11T12:06:21+5:30

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी सातत्याने सत्यशोधक समाजाच्या सभा, बैठकींना महात्मा फुलेंची हजेरी

Mahatma Jyotiba Phule in Marathwada; The road from Aurangabad to Paithan was built for the first time by Mahatma Jyotibani Fule | मराठवाड्यास महात्मा फुलेंचा पदस्पर्श; औरंगाबाद ते पैठण रस्ता पहिल्यांदा बांधला जोतिबांनी

मराठवाड्यास महात्मा फुलेंचा पदस्पर्श; औरंगाबाद ते पैठण रस्ता पहिल्यांदा बांधला जोतिबांनी

googlenewsNext

- विकास राऊत

औरंगाबाद : महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule ) या समतेच्या मार्गाने जाणाऱ्या शांतीदूतांनी औरंगाबाद ते पैठण या रस्त्याची पहिल्यांदा पायाभरणी केली ती १८७० च्या दशकात. सत्यशोधक चळवळीचे केंद्र आणि नाथनगरीकडे जाण्यासाठी पुणे कमर्शियल ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर या कंपनीकडून महात्मा फुले यांनी निजाम संस्थानाच्या काळात त्या रस्त्याचे काम केले. (The road from Aurangabad to Paithan was built for the first time by Mahatma Jyotibani Fule) 

यानिमित्ताने महात्मा फुले यांचा मराठवाड्यात पदस्पर्श झाला. पुढे कन्नड, जालना, चौसाळा, उदगीर, निलंग्यासह पूर्ण मराठवाड्यात सत्यशोधक समाज ही चळवळ वाढली, त्या निमित्ताने फुले यांचे या विभागात येणे-जाणे राहिले. पुण्यावरून औरंगाबादकडे येताना वन गार्डन पूल १८६९ साली बांधण्यात आला. कात्रजचा बोगदा त्यांच्या कंपनीने बांधला आहे. त्यांच्या कंपनीने राज्यभर रस्त्यांची कामे केली. सयाजी महाराजांचा बडोद्यातील राजवाडा, मुंबई मनपाचे मुख्यालय, एका इंग्रजी वृत्तपत्राचे मुंबईतील कार्यालय, राज्यातील काही धरणांची व कालव्यांची कामेदेखील महात्मा फुले यांच्या कंपनीने केली.

मराठवाडा सत्यशोधक चळवळीचे मोठे केंद्र
मराठवाड्याशी फुले यांचा तीनप्रकरणी संबंध आला. सत्यशोधक चळवळ उभी राहिली, त्यावेळी मराठवाडा निजामाच्या आधिपत्याखाली होता. उमरगा, लातूर, उदगीर, उस्मानाबाद, नांदेडपर्यंत सत्यशोधक समाजाची आंदोलने, मेळावे झाले. बीड जिल्ह्यात चौसाळा येथे सत्यशोधक चळवळीचे जलसे होत. जालना, कन्नड ही चळवळीची केंद्रे राहिली. ‘आम्ही पाहिलेले महात्मा फुले’ आणि ‘महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा’ ही दोन्ही पुस्तके शासनाने प्रकाशित केली असून त्यामध्ये फुले यांचा मराठवाड्याशी संबंध व औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या कामाचे विवेचन आहे.
- प्रा. हरी नरके, महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक

१८७० च्या दशकांत पैठण रस्त्याचे काम
फुले यांच्या कंपनीने निजाम स्टेटकडून काम घेतले होते. पहिल्यांदा त्या रस्त्याचे काम महात्मा फुले यांनी केले. कन्नड येथे सत्यशोधक समाजाची बैठक झाली होती, त्या बैठकीला स्वत: फुले यांनी मार्गदर्शन केले होते. सत्यशोधक जलशांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात चौसाळा येथे काम काही जण करीत असत. तेथून सत्यशोधक चळवळीचा मराठवाड्यात प्रसार झाला. निलंगा, उमरग्यातून आलेले कृष्णाजी भालेकर (जे फुले यांचे अनुयायी होते), यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र चालविले.
- डॉ. वि. ल. धारूरकर, सेवानिवृत्त प्रपाठक

Web Title: Mahatma Jyotiba Phule in Marathwada; The road from Aurangabad to Paithan was built for the first time by Mahatma Jyotibani Fule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.