महाराष्ट्राचा स्टार फलंदाज अंकित बावणे यंदा घरच्या मैदानावर ‘एपीएल’मध्ये खेळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:15 IST2025-01-31T15:13:11+5:302025-01-31T15:15:28+5:30
बीसीसीआयच्या रणजी करंडक आणि विजय हजारे करंडकात अंकित बावणे याने शानदार फलंदाजी केली आहे.

महाराष्ट्राचा स्टार फलंदाज अंकित बावणे यंदा घरच्या मैदानावर ‘एपीएल’मध्ये खेळणार
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र रणजी संघाचे कर्णधारपद भूषवणारा छत्रपती संभाजीनगरचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे यंदा अनेक वर्षांनंतर घरच्या मैदानावर लोकमत एपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. तो यंदा ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व ओपनचा खेळाडू म्हणून करणार आहे. ए. ए. प्रस्तुत लोकमत एपीएलला १ फेब्रुवारीपासून गरवारे स्टेडियमवर प्रारंभ होत आहे. गतवर्षीप्रमाणेच अपूर्व वानखेडे, धर्मेश पटेल, दीपक खत्री यंदाही एपीएलचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
बीसीसीआयच्या रणजी करंडक आणि विजय हजारे करंडकात अंकित बावणे याने शानदार फलंदाजी केली आहे. तसेच महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या सुरेंद्र भावे यांचा प्रथमश्रेणीतील सर्वाधिक धावांचा विक्रमही मागे टाकला. याच हंगामात अंकितने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत देशात सर्वाधिक शतके व धावांचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे अंकित बावणे हा नक्कीच चांगली कामगिरी करण्यास आतूर असणार आहे. ग्रीन गोल्ड सान्या युनायटेडने गत हंमागात प्रभावी कामगिरी करणाऱ्या विनायक भोईरला यंदाही त्यांच्या संघात ओपनचा खेळाडू म्हणून घेतले आहे. बीडचा ऋषिकेश सोनवणेदेखील याच संघाकडून खेळणार आहे. विद्यमान चॅम्पियन संघ राव रॉयल्सने दीपक खत्रीला पुन्हा ओपन खेळाडू म्हणून संघात कायम ठेवले आहे. नंदिनी स्टार्सने अभिषेक पाठक व त्रिपुरेश सिंगला संघात घेतले आहे. शिंदे रायझिंग किंग्जने ओम भोसले याला ओपन खेळाडू म्हणून पसंती दिली आहे. भवानी टायगर्सने त्यांचे ओपन खेळाडू अद्याप जाहीर केलेले नाहीत.
नयन गुड्डू ईएमआय २१ कडून तर सुयश प्रभुदेसाई पटेल वॉरियर्सकडून खेळणार
पटेल वॉरियर्सने यंदा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुयश प्रभुदेसाईला ओपन खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आहे.
सीएल कासा स्ट्रायकर्सने यंदा संदीप दहाडला संधी दिली आहे. तसेच गत एपीएलचे दोन पर्व गाजवणारा नयन चव्हाण यंदा गुड्डू ईएमआय संघाकडून खेळताना दिसणार आहे. धर्मेश पटेललाही संघाने कायम ठेवले आहे. मनजित प्राइडने गगनभेदी षटकार खेचण्यात वाकबगार असणारा अपूर्व वानखेडेला ओपन खेळाडू म्हणून संघात पसंती दिली आहे.
एपीएलमधील ओपन खेळाडूंची यादी
ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड : विनायक भोईर, ऋषिकेश सोनवणे, अंकित बावणे, यश चव्हाण. सीएल कासा स्ट्रायकर्स : मोहित जांगरा, सागर मिश्रा, संदीप दहाड. राव रॉयल्स : भारत शर्मा, दीपक खत्री, मोहित खत्री. गुड्डू ईएमआय २१ : यासर शेख, धर्मेश पटेल, प्रवीण देशेट्टी, नयन चव्हाण. नंदिनी स्टार्स : अभिषेक पाठक, त्रिपुरेश सिंग, मनजित प्राइड वर्ल्ड : अपूर्व वानखेडे, साईराज पाटील, पटेल वॉरियर्स : सुयश प्रभुदेसाई, मुर्तजा ट्रंकवाला, एस. चढ्ढा. लाइफ लाइन मॅव्हरिक्स : अमन खान, भाऊ पुनिया, सागर उद्देशी, सत्यम भोईर, शिंदे रायझिंग किंग्ज : ओम भोसले.