Maharashtra Election 2019 : भाजपाच्या दोन मंत्र्यांचे जावई आमनेसामने...तेही अपक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:54 PM2019-10-07T18:54:52+5:302019-10-07T18:58:35+5:30

मतदारसंघात होणाऱ्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असुन चौरंगी लढत होणार आहे.

Maharashtra Election 2019 : Two BJP Ministers son-in-law's face-to-face in Kannada | Maharashtra Election 2019 : भाजपाच्या दोन मंत्र्यांचे जावई आमनेसामने...तेही अपक्ष 

Maharashtra Election 2019 : भाजपाच्या दोन मंत्र्यांचे जावई आमनेसामने...तेही अपक्ष 

googlenewsNext

कन्नड - भारतीय जनता पक्षाच्या दोन मंत्र्यांचे जावई विधानसभा निवडणुकीत आमने -सामने निवडणुक रिंगणात उतरले आहेत.विशेष म्हणजे दोघेही अपक्ष निवडणुक लढवित आहेत. तर दोन्ही मंत्री एकाच जिल्ह्यातील आहेत. 

केंद्रात ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव आणि महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळातील ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार हे निवडणुक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या वेळे अखेर सहा जणांनी उमेदवारी अर्ज परत घेतले असुन आठ जण निवडणुक रिंगणात आहेत. भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्याने बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. मतदारसंघात होणाऱ्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असुन चौरंगी लढत होणार आहे.

भाजपाचे हतनुर जिल्हा परिषद सदस्य आणि पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांनी बंडखोरी करून निवडणुक लढविण्याचा इरादा सोमवारी दुपारी घेतलेल्या मेळाव्यातच केली. त्यामुळे ते निवडणुक लढणारच हे स्पष्ट झाले होते. किशोर पवार हे स्व. नारायणराव पवार यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या तत्कालीन कार्यकर्त्याची फळी, भाजप कार्यकर्त्याची एक फळी त्यांच्या सोबत असल्याचे मेळाव्यात दिसुन आले. लोकसभा निवडणुकीत किशोर पवार यांनी एकनिष्ठपणे शिवसेनेचा प्रचार करून मतदान केले होते. या मतांचा फटका शिवसेनेला बसणार आहे तर मागील विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधवांना या भागात मिळालेल्या मतांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने त्यांनाही फटका बसणार आहे. बंजारा समाजावर स्व. नारायणराव पवारांची पकड होती. त्यामुळे या समाजातील त्यांचे कार्यकर्ते किती प्रमाणात मदत करतात अर्थात हा फटकाही शिवसेनेच्या उदयसिंग राजपुत यांनाच बसणार आहे. राष्ट्रवादीलाही थोड्या मतांचा फटका बसेल. त्यामुळे किशोर पवार यांच्या बंडखोरीने निवडणुकीचे समीकरण बदलणार आहे. पक्षाच्या दबावामुळे भाजपचे दुसरे बंडखोर उमेदवार संजय गव्हाणे यांनी उमेदवारी अर्ज परत घेतल्याची चर्चा आहे.

यांनी घेतली माघार
संजय गव्हाणे ( अपक्ष ), पुनमबाई राजपुत ( अपक्ष ), प्रसन्ना पाटील ( अपक्ष ), राजेंद्र राठोड ( अपक्ष ), भरत जाधव ( अपक्ष ), याकुब शेख ( अपक्ष ).

हे आहेत रिंगणात
हर्षवर्धन जाधव ( अपक्ष ), किशोर पवार ( अपक्ष ), संतोष कोल्हे ( राष्ट्रवादी काँग्रेस ), उदयसिंग राजपुत ( शिवसेना ), मारुती राठोड ( वंचित बहुजन आघाडी ), सुनिल चव्हाण ( भारतीय शेतकरी कामगार पक्ष ), विठ्ठल थोरात ( अपक्ष ) व अंबादास सगट ( अपक्ष ).

Web Title: Maharashtra Election 2019 : Two BJP Ministers son-in-law's face-to-face in Kannada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.