काय चुकले ते सांगा, चुक सुधारतो : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 08:42 AM2019-10-11T08:42:03+5:302019-10-11T08:46:14+5:30

राग काढतांना सुध्दा आपण कुणाला मदत करतो आहोत, हे पण पहा.

Maharashtra Election 2019 : Tell us what went wrong, the mistake recovers: Uddhav Thackeray | काय चुकले ते सांगा, चुक सुधारतो : उद्धव ठाकरे

काय चुकले ते सांगा, चुक सुधारतो : उद्धव ठाकरे

googlenewsNext
ठळक मुद्देशरद पवार, अजित पवारांवर टीकास्त्र

औरंगाबाद : शहराभोवती एमआयएमचा पडणारा विळखा काढून टाका. आजवर जे काय घडले असेल, त्यावरून तुमचा राग आमच्यावर आहे, हे मान्य आहे. जर का तुम्ही त्यावेळी चिडून शिवसेना-भाजपाला मतदान केले नसेल तर काय चुक असेल ती सांगा, चुक सुधारण्याची जबाबदारी माझी आहे. जर का? शिक्षा म्हणून तुम्ही मतदान केले असेल तर त्याची फळे पुढच्या पिढीला भोगावी लागतील. जे झाले ते झाले पुन्हा होऊ देऊ नका. चुक झाली तर जबाबदारी माझी असेल. राग काढतांना सुध्दा आपण कुणाला मदत करतो आहोत, हे पण पहा. असे आवाहन शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरूवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत केले. सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे  सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांनाही ठाकरे यांनी टीकेचे लक्ष्य केले.

विधानसभा निवडणुकी निमित्ताने युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात ठाकरे यांनी तीन सभा घेतल्या. शेवटची सभा त्यांनी औरंगाबादेत घेतली. ठाकरे म्हणाले, दिल्लीत औरंगाबादचा खासदार नाही, याचे दु:ख आजही कायम आहे. आपल्या रागाची मला कल्पना आहे. चुका झाल्या तर तुुम्ही कान खेचाच, मीही कान उपटल्या शिवाय राहणार नाही.
शहरात कचºयाचा प्रश्न होता, तो आजही थोडाफार शिल्लक असेल, तुम्ही सांगा, त्यावेळी नामुष्कीची वेळ होती. कचरा टाकायचा कुठे ही समस्या होती. तेव्हा जे कचºयाचे साम्राज्य होते. ते आता राहिले आहे काय, ते सांगा. पाण्याचा प्रश्न सुटेल, १६८० कोटी सरकारने मंजुर केले आहेत. स्वच्छ पाणी सरकार आल्यावर देणार. गेले पाच वर्ष अनुभव गोळा करण्यात गेले. शिवसेना-भाजपातील संबंध कसे राहिले हे जगजाहीर आहे. पाच वर्षांत कधी तरी शिवसेनेने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला का? तंगड्यात तंगड्या घातल्या का, शेतकºयांच्या बाबतीत जे पटले नाही, ते पटले नाही. आमचे म्हणणे पटले ते सरकारने केले. मारून मुटकून विकास परवडणारा नाही. या शहरात जसा कचºयाचा प्रश्न होता. तसा उद्योगधंद्याचा प्रश्न आहे. बेरोजगारी वाढते आहे. महिलांमध्ये शिक्षण वाढतेय पण बेरोजगारी आहे. सरकार आल्यावर स्वस्तातील घरकुल देण्यात येतील.

अजित पवार म्हणतात, ५ वर्ष झोपले होतात काय. झोपलो नव्हतो तुमचे नाटकं  पाहत होतो. रडतात काय, लपतात काय, सुशील कुमार म्हणाले, थकलो आहोत. टीका करायची तर कुणावर करायची, असा प्रश्न आहे. काँग्रेस पक्ष देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा घटक आहे. पुर्वीचे नेते विभूतीप्रमाणे होते. शिवसेनाप्रमुख म्हणायचे, तेव्हाचे नेते समोर आल्यावर आदराने मान खाली जायची. आताचे नेते समोर आल्यावर शरमेने मान खाली जाते. तसेच शरद पवार आहेत, कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडल्याविना राहणार नाही, असे म्हणतात. पवार तुम्ही वयाने मोठे आहात. सरकार पाडण्याचा दांडगा अनुभव आहे. आपण विघ्नसंतोषी आहात हे सगळ्यांना माहिती आहे. वसंतदादांचे सरकार आपण पाडले होते, हे माहिती आहे. आम्ही तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. कारण हे सरकारच जाणार नाही, तुम्ही असेच कार्यरत रहा, तुम्हाला काम मिळू दे अशी माझी प्रार्थना आहे. व्यासपीठावर युतीचे सर्व उमेदवार,स्थानिक नेते होते.

जाधवांचे नाव न घेता हल्ला
कन्नडच्या सभेत बोललो. विश्वासघातकीने औरंगाबादवरील भगवा उतरविण्यासाठी हिरव्याची साथ दिली, त्याला आता माफी नाही. पाच वर्ष त्याच्या चुका लहान म्हणून पोटात घेत समजून घेतले. भगव्याच्या विरोधात गेला आता सहन करणार नाही. असा हल्ला हर्षवर्धन जाधव यांच्यावर ठाकरे यांनी नाव न घेता चढविला.

खा.जलील यांच्यावर टीका
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील ही वीरांची भूमी आहे. वीरांचे स्मरण करण्यासाठी सुध्दा हिरवा खासदार (खा.इम्तियाज जलील) आला नाही. याची त्याला नाही,आपल्याला लाज वाटली पाहिजे. माझे यावेळी राहिले पुढच्यावेळी येईल, असे बोलतो. तो काही उपकार करत नाही.

तुमचे गडकरी, आमचे शिंदे
युतीच्या सरकारच्या काळात नितीन गडकरींनी बुल्डोझरप्रमाणे काम केले, रस्ते निर्माण केले. तसेच आता समृध्दी महामार्गाचे काम करतांना शिवसेनेचे एकनाथ शिंदे नाहीत काय? असेही ठाकरे म्हणाले.

Web Title: Maharashtra Election 2019 : Tell us what went wrong, the mistake recovers: Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.