शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Maharashtra Election 2019: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबल्या; प्रचाराच्या तोफा रॅलीनंतर थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 7:01 PM

विधानसभा निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आज सायंकाळी थांबल्या 

ठळक मुद्देमतदानासाठी निवडणूक विभाग व प्रशासन सज्ज 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावल्या. तीन आठवड्यांपासून सुरू असलेले आरोप- प्रत्यारोप थांबले. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची धावपळ सुरू आहे. जास्तीत जास्त मतदान आपल्या पदरात कसे पाडून घेता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी प्रत्यक्ष मतदान होईल.मतदारांना शासकीय पोलचिट मिळाले किंवा नाही, यासाठी उमेदवारांनी कार्यकर्त्यांची फौज कामाला लावली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. अनेक ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. जिल्ह्यातील सिल्लोड, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद शहरात शिवसेना-भाजप युतीने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघांत एमआयएम पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. यातील औरंगाबाद मध्य मतदारसंघ एमआयएमसाठी महत्त्वपूर्ण आहे. मागील निवडणुकीत एमआयएमने हा मतदारसंघ सेनेकडून हिसकावून घेतला होता. यंदा मतदारसंघ परत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात निवडणूक रंजक ठरत आहे.शिवसेना उमेदवाराचे हॅट्ट्रिकसाठी जोरदार प्रयत्न सुरु  आहेत. भाजप बंडखोर अपक्ष उमेदवाराने या मतदारसंघात चांगलेच आव्हान उभे केले आहे. 

सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या. याची सर्वात अगोदर सुरुवात एमआयएम पक्षाने केली. आमखास मैदानावर असदुद्दीन ओवेसी यांची २ आॅक्टोबरला सभा झाली. त्यानंतर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही सभा झाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचीही सभा आमखास मैदानावर घेण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सांस्कृतिक मंडळावर सभा घेतली. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आगामी दोन दिवस शहरात तळ ठोकणार आहेत.

शेवटच्या दिवशी दुचाकी रॅलीची धूम विधानसभा निवडणुकीची प्रचाराची सांगता प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी दुचाकी रॅलीने केली.  मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ क्रांतीचौक येथून, पूर्व मतदारसंघाचे भाजप उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ एन-७ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून, पश्चिम मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारार्थ कोकणवाडी येथून, फुलंब्री मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या प्रचारार्थ चिकलठाणा आठवडी बाजार येथून रॅली काढण्यात आली. तर मध्य आणि पूर्व मतदारसंघातील एमआयएमच्या उमेदवारांसाठी एमआयएमचे सर्वेसर्वा खा.ओवेसी यांची कटकटगेट येथे पदयात्रा काढली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमAurangabadऔरंगाबाद