शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

Maharashtra Election 2019 : खासदार जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 8:20 PM

कदीर मौलाना आणि खा. जलील हे परस्परांवर धावून गेले.

औरंगाबाद: मतदान संपण्यास अवघा अर्धा तास शिल्लक राहिला असताना एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी झालेल्या ओढाताणीमध्ये  खासदार इम्तियाज जलील यांच्या अंगावरील कपडे फाटल्याची घटना सोमवारी सायंकाळी कटकटगेट परिसरात घडली. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी लाठी हल्ला करून जमाव पांगविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.

मध्य विधानसभा मतदार संघातील एमआयएम उमेदवार नासेर सिद्दीकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या कार्यकर्त्यामध्ये सोमवारी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर ठिकठिकाणी शाब्दिक चकमक होत होती. कटकटगेट येथील इकरा हायस्कुल या मतदान केंद्राबाहेर कदीर मौलाना यांचे समर्थक तथा एमआयएमचे बंडखोर नगरसेवक अज्जू पहेलवान आणि नासेर सिद्दीकी यांचे समर्थक नगरसेवक सलीम सहारा यांच्यात वाद झाला. यावेळी दोन पक्षाचे लोक आमनेसामने आल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही पक्षाच्या समर्थकांना वेगळे केले.

 

यानंतर अज्जू पहेलवान आणि उमेदवार कदीर मौलाना आणि कार्यकर्ते त्यांच्या मंडपखाली खुर्चीवर बसलेले होते. त्याचवेळी खासदार इम्तियाज जलील, नगरसेवक सलीम सहारा, नगरसेवक फेरोज खान, बाबा बिल्डर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यासह तेथे दाखल झाले. कदीर मौलाना यांच्यासोबत वाद झाल्याचे त्यांना समजल्यानंतर खा. जलील हे पदाधिक ारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडपकडे गेले. कदीर मौलाना आणि खा. जलील हे परस्परांवर धावून गेले. यावेळी वातावरण चिघळल्याचे पाहुन पोलिसांनी जोरदार लाठीहल्ला करून जमावाला पांगविले. यावेळी झालेल्या ओढाताणीमध्ये खा. जलील यांच्या अंगावरील शर्ट फाटला. या घटनेनंतर कटकटगेट परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, उपायुक्त डॉ.राहुल खाडे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे आणि दंगाकाबू पथकासह पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

केवळ कार्यकर्त्यांत किरकोळ हाणामारी

कटकटगेट येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. केवळ कार्यकर्त्यांत किरकोळ हाणामारी झाली. पोलिसांनी लाठीहल्ला करून जमावाला पांगविल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शहरात शांतता आहे. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये.  - चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यImtiaz Jalilइम्तियाज जलीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन