शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पूर्व : जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार असलेल्या मतदारसंघाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 14:08 IST

मतदार बाहेर काढताना दमछाक 

ठळक मुद्देसरासरी ६१.७५ टक्के

औरंगाबाद : पूर्व मतदारसंघात सरासरी ६१.७५ टक्के मतदान झाले. या टक्केवारीनुसार १ लाख ९६ हजार ३३९ मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदारांमध्ये निरुत्साह असल्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का घसरला.

मतदारसंघात ३१२ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सर्वाधिक ३४ उमेदवार पूर्व मतदारसंघात होते. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजप, एमआयएम, काँग्रेस पुरस्कृत, समाजवादी पार्टी अशी लढत मतदारसंघात झाली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी अतिशय कमी होती. दुपारनंतर मतदान वाढले. सायंकाळच्या टप्प्यात मतदानाचा जोर वाढल्यामुळे सरासरी ६१.७५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. मतदारसंघातील ३४ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात आले होते. 

मतदानकेंद्रांचा फेरफटका मारला असता नारेगाव, ब्रिजवाडी, सिंदीबन व  रोशनगेट, किराडपुरा, बायजीपुरा येथील मतदान केंद्रांवर गर्दी होती.  काही केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेच्या आसपास ७० टक्क्यांच्या पुढे मतदान झाले होते. काही ठिकाणचे मतदान केंद्र बदलण्यात आले होते. त्याची माहिती मतदारांपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिली गेली नाही. पुंडलिकनगर परिसरासाठी असलेले कडा आॅफिस येथील मतदान केंद्र बीएसजीएम शाळेत स्थलांतरित झाल्याची माहिती मतदारांना मिळालीच नाही. त्यामुळे अनेकांनी हेलपाटे मारल्यानंतर केंद्र बदलल्याची माहिती समोर आली. यामुळेदेखील मतदानाच्या टक्क्यांवर परिणाम झाला. 

पैसे वाटपाची अफवापैसे वाटत असल्याच्या अफवेवरून काही ठिकाणी प्रचंड गदारोळ झाला. आंबेडकरनगर, सिंदीबन येथील मतदान केंद्रांच्या बाहेर प्रचंड गर्दी होती. परंतु पैसे वाटप होत असल्याची ती अफवा ठरली. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी दुपारनंतर प्रयत्न केले. परंतु मतदानाचा अपेक्षित टक्का वाढला नाही. 

मतदानावरून आकडेमोड सुरू पूर्व मतदारसंघातील हिंदूबहुल भागातील अनेक केंद्रांवर ६० टक्क्यांच्या पुढे मतदान झाले आहे. त्या तुलनेत मुस्लिम व दलित भागातील केंद्रांवरदेखील मतदान झाले आहे. त्याची माहिती घेऊन प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांनी आकडेमोड करण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबाद पूर्वमध्ये असा वाढला मतदानाचा टक्कासकाळी ७ ते ९ वाजता    :    ८.०५ टक्केसकाळी ९ ते ११ वाजता    :    १३.०९  टक्केदुपारी ११ ते १ वाजता    :    २८.०२टक्के दुपारी १ ते ३ वाजता    :    ४४.०८ टक्के सायंकाळी ३ ते ५ वाजता    :    ५४.५५ टक्के सायंकाळी ५ ते ६ वाजता    :    ६१.७३ टक्के

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वVotingमतदानAurangabadऔरंगाबाद