शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : मराठवाड्यात जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 18:34 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोेर्चाच्या वतीने गुरुवारी पुकारलेल्या बंददरम्यान जाळपोळ, रेल्वरोको आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या.

ठळक मुद्देमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोेर्चाच्या वतीने गुरुवारी पुकारलेल्या बंददरम्यान जाळपोळ, रेल्वरोको आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारपर्यंत एकुण ३६ जणांना ताब्यात घेतले आहे. 

औरंगाबादेतील  वाळूज एमआयडीसीतील तोडफोड आणि जाळपोळप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी ३० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेल्वे रोखल्याप्रकरणी जवळपास चार हजार आंदोलकांवर लोहमार्ग गुन्हा नोंद केला आहे. 

उस्मानाबादेत ३५ आंदोलकांवर गुन्हे 

उस्मानाबाद : जिल्ह्यात बंददरम्यान वाशी येथील ग्रामीण रूग्णालयासमोरील महामार्गावर टायर जाळण्यात आले होते़ या प्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुरूवारी वाशी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी वाशी शहर बंद ठेवण्यात आले़ भूम शहरात  बसवर दगडफेक केल्याप्रकरणी आगारप्रमुखांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३० जणांविरूध्द भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भूम पोलिसांनी शुक्रवारी चौघांना ताब्यात घेतले होते़

लातूरात तीन ठिकाणी दगडफेक; २७ जणांविरूद्ध गुन्हालातूर : आंदोलनादरम्यान औसा तालुक्यातील नागरसोगा येथे एका बसवर दगडफेक झाली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तर लातूर महापालिकेसमोर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्यात २० अज्ञातांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. तसेच अहमदपूर शहरात अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली असून, सदर प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद आहे.

परभणी जिल्ह्यात ४४ जणांवर गुन्हे परभणी : जिल्ह्यात मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील राष्ट्रीय महामार्ग २२२ वर टोल नाक्याची तोडफोड केल्या प्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जिंतूर येथे रस्त्यावर झाड टाकून रस्ता अडवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिलाबाद- परळी या रेल्वेवर दगडफेक केल्याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री परभणी- गंगाखेड रस्त्यावर एस.टी.बसवर दगडफेकीच्या घटनेत गुरुवारी मध्यरात्री दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

बीड जिल्ह्यात ३२ जणांविरूद्ध दाखलबीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान, वाहनांवर दगडफेक करणे, ट्रक जाळणे व रस्त्यावर टायर जाळून वाहतूकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जवळपास २० जणांविरोधात बीड ग्रामीण व पिंपळनेर पोलीस ठाण्यात असे दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तामिळनाडू येथून औरंगाबादकडे नारळ घेऊन जाणार ट्रक दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी अडवून पेट्रोल टाकून पेटविला. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचेही पोलीस सूत्रांकडून समजते. बीड तालुक्यातील घाटसावळी येथे रस्त्यावरच टायर जाळण्यात आले. तसेच काही लोकांनी रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सांगितले.

जाळपोळ प्रकरणी ११ जणांवर गुन्हासेनगाव (जि. हिंगोली) : बंददरम्यान सेनगाव शहरात जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी ११ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आहेत. यामध्ये  शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, निखिल पानपट्टे, हेमंत संघई, अमोल तिडके, प्रवीण महाजन, अनिल गिते, दत्ता देशमुख, जगदीश गाढवे, पंढरी गव्हाणे, सनी व चालक हरण आदींचा समावेश आहे. तर तोष्णीवाल महाविद्यालयाची स्कूल बस जाळल्याच्या प्रकरणात अज्ञात चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारीही तणावपूर्ण परिस्थितीत असून, संपूर्ण शहरात कडकडीत बंद होता. दरम्यान, तहसीलसमोर सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सातव्या दिवशीही कायम होते.

नांदेडात ३०० जणांविरोधात गुन्हेनांदेड : क्रांती दिनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक घटनांच्या पार्श्वभूमीवर सात पोलीस ठाण्यात ३०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ जिल्ह्यातील हदगाव, तामसा, देगलूर, कंधार, उमरी, अर्धापूर, मरखेल या सात पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्या ३०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ जाळपोळ आणि दगडफेकीमुळे गुरुवारी २४ लाख ६१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़ 

जालन्यात दोन प्रकरणात २२ जणांवर गुन्हे जालना : सकल मराठा समाजातर्फे गुरूवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. यादरम्यान जालन्यातील हॉटेल अंबर परिसरात काही जणांनी दगडफेक केली होती. याप्रकरणी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात ९ आणि जाफराबाद तालुक्यातील १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस विशेष शाखेकडून देण्यात आली.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणMarathwadaमराठवाडाPoliceपोलिस