शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : यादी जाहीर झाली तरीही अनेक आमदार भाजपत येण्यास तयार : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:19 IST

आतापर्यंतच्या इतिहासात विरोधकांची सर्वाधिक वाईट परिस्थिती झालेली आहे.

ठळक मुद्देअतुल सावे यांच्या औरंगाबाद पूर्वमधील प्रचार कार्यालयाचे उद्घाटनसर्वानी मेहनत करून अतुल सावे यांना निवडून द्यावे.

औरंगाबाद : भाजप- शिवसेनेसह इतर मित्र पक्षांची युती झालेली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात तुम्ही सर्वांनी मेहनत करून अतुल सावे यांना निवडून द्यावे. त्यांना अगोदर राज्यमंत्री केले. आता मी कॅबिनेट मंत्री करतो, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारांना केले.

भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीमध्ये राज्यमंत्री अतुल सावे यांना औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रावसाहेब  दानवे यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे, शिवसेना आ. अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, ‘रिपाइं-ए’चे बाबूराव कदम, संजय केणेकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी दानवे म्हणाले की, भाजप-शिवसेनेची मागील ३० वर्षांत फक्त एकदाच युती तुटलेली आहे. आता युतीची घोषणा करण्यात आल्यामुळे राज्यात २२५ जागा निवडून येणार आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात विरोधकांची सर्वाधिक वाईट परिस्थिती झालेली आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाली तरीही अनेक आमदार भाजपत येण्यास तयार आहेत. आज सकाळीच दोन आमदार भेटून विनवणी करीत होते. मात्र, शिवसेना- भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना पक्षात प्रवेश दिला नाही. निष्ठावंतांनाच न्याय देण्याचा निर्णय घेतला. युतीतील पक्ष हे विचारांना बांधलेले आहेत. त्यामुळे औरंगाबाद पूर्वमध्ये विजय निश्चितच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाची घौडदौड सुरू आहे. मोदींनी जगभर फिरून भारतात गुंतवणूक आणली. त्यातील ३५ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या विकासासाठी गुंतवणूक महत्त्वाची असून, समृद्धीसारखा महामार्ग बनवला आहे. आणखी विकास करण्यासाठी अतुल सावेंना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अतुल सावे, आ. अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, रिपाईचे बाबूराव कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.

पूर्वसह मध्य व पश्चिमकडेही लक्ष द्याशिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी मित्रपक्षाच्या उमेदवाराचे काम करणार आहेत. मात्र, केवळ पूर्वकडे पाहून चालणार नाही, तर शहरातील शिवसेना लढवत असलेल्या पश्चिम, मध्य विधानसभा मतदारसंघांकडेही भाजपला लक्ष द्यावे लागेल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादBJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवे