'औरंगाबाद मध्य'साठी सेनेकडून जैस्वलाच आघाडीवर; तनवाणी यांच्या सेनाप्रवेशाच्या केवळ चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:53 PM2019-09-30T17:53:34+5:302019-09-30T17:57:07+5:30

तनवाणी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा भाजपा कडूनच उठविण्यात आल्याची माहिती

Maharashtra Assembly Election 2019 :Jaiswala leads by Sena for 'Aurangabad Central'; rumors of Tanwani's Shiv sena entry | 'औरंगाबाद मध्य'साठी सेनेकडून जैस्वलाच आघाडीवर; तनवाणी यांच्या सेनाप्रवेशाच्या केवळ चर्चा

'औरंगाबाद मध्य'साठी सेनेकडून जैस्वलाच आघाडीवर; तनवाणी यांच्या सेनाप्रवेशाच्या केवळ चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्दे सेनेकडून माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनाच उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता आहे. 

औरंगाबाद:  मध्य विधानसभा मतदार संघात शिवसेनेने उमेदवारीचा निर्णय घेतला नाही. इच्छुक उमेदवार मातोश्रीवर तळ ठोकून आहेत. प्रदीप जैस्वाल यांचे नाव आघाडीवर असून सायंकाळपर्यंत त्यांना एबी फॉर्म मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे किशनचंद तनवाणी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा भाजपा कडूनच उठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

भाजप-सेना युतीत औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ सेनेकडे आहे. सेनेते इच्छुकांची मोठी यादी आहे. यातच भाजपच्या किशनचंद तनवाणी यांचे नावही चर्चेत येत आहे. मात्र ते भाजपकडून नाही तर शिवसेनेकडून तिकीट मिळविणार अशी चर्चा सोशल मिडीयावर जोर धरत आहे. मात्र या चर्चा केवळ अफवा असून त्या भाजपच्या गोटातूनच पसरवल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच मतदारसंघात सेनेकडून माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनाच उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता आहे. 

शिवेसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद मध्य या मतदारसंघात सेनेकडून कोण उमेदवार असणार यावर उत्सुकता आहे. प्रदीप जैस्वाल यांनी या मतदारसंघाचे या पूर्वी २००९ मध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्यावेळी त्यांनी सेनेतून बाहेर पासून औरंगाबाद विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. तर २०१४ मध्ये जैस्वाल यांना सेनेने परत पक्षात घेत तिकीट दिले. यामुळे किशनचंद तनवाणी यांनी सेनेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करत विधानसभा लढवली. मात्र मत विभागणीचा फायद घेत एमआयएमच्या इम्तीयाज जलील यांनी इथे बाजी मारली. यानंतर मागील पाच वर्षात सेना आणि भाजपा दोन्ही पक्षाने मतदारसंघात आपली ताकद वाढवली आहे. 

दरम्यान, निवडणूक भाजपा किंवा शिवसेनेच्याच तिकिटावरच लढवणार; बंडखोरी करणार नाही. औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ शिवसेनेला सुटलेला नाही; असे सूचक वक्तव्य किशनचंद तनवाणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले. यामुळे 'मध्य'च्या उमेदवारीवरून उत्कंठा वाढली आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 :Jaiswala leads by Sena for 'Aurangabad Central'; rumors of Tanwani's Shiv sena entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.