महावीर चौकातील उड्डाणपुलाला गळती!
By Admin | Updated: July 6, 2016 00:38 IST2016-07-05T23:59:02+5:302016-07-06T00:38:18+5:30
औरंगाबाद : मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेल्या दमदार पावसाने शहरात दाणादाण उडवून दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेल्या महावीर चौकातील नवीन उड्डाणपुलालाही पावसामुळे गळती लागली.

महावीर चौकातील उड्डाणपुलाला गळती!
औरंगाबाद : मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेल्या दमदार पावसाने शहरात दाणादाण उडवून दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेल्या महावीर चौकातील नवीन उड्डाणपुलालाही पावसामुळे गळती लागली. २० जून रोजी सिडको आणि महावीर चौकातील पुलांचे लोकार्पण झाले. त्यानंतर १५ व्या दिवशी शहरात झालेल्या ६६.५ मि.मी. पावसाने महावीर चौकातील पुलाला गळती लावली. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांचे लक्ष पुलाला लागलेल्या गळतीकडे गेले.
एमएसआरडीसीने बांधलेल्या त्या उड्डाणपुलाची ‘प्रूफ लोड टेस्ट’ मुंबईतील व्हीजेटी या संस्थेने प्रकल्प व्यवस्थापन समितीने केल्यानंतर पूल वाहतुकीला खुला करण्यात आला. पुलाच्या पहिल्या पिलर (कॉलम) पासून दुसऱ्या पिलरपर्यंतचे अंतर ५० मीटरपर्यंत आहे. त्यामुळे ही चाचणी करण्यात आली.
महावीर स्तंभाच्या उजव्या आणि डाव्या बाजूचा पिलर हा २५ मीटर अंतरावर आहे. त्यामुळे पुलावरील काँक्र ीटचा ट्रान्सपोर्ट पॅसेज मोठा आहे. त्यात मोठ्या प्रमाणात लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही स्लॅबमध्ये सांध असल्यामुळे गळती लागली.
अभियंते म्हणाले,
पुलाच्या काँक्रीटमधील लोखंडावर गळतीमुळे परिणाम होऊ शकतो का? यावर एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव म्हणाले, दोन स्पॅन वेगवेगळे आहेत. दुभाजकामध्ये गॅप आहे. ५० मीटरपर्यंत स्लॅबचे अंतर आहे. मधोमध पोकळ जागा असल्यामुळे दुभाजकातून ते पाणी झिरपले तरी त्याचा पुलाच्या स्लॅबला काहीही धोका होत नसतो. तरीही बुधवारी पुलाची पाहणी करण्यात येईल. नव्या पुलाला गळती लागल्याने खळबळ उडाली आहे.