शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजला मंचाचा ‘झटका’

By admin | Updated: July 9, 2014 00:28 IST

लोहारा : महाबीजचे तुरीचे बियाणे सदोष निघाल्याप्रकरणी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याने लातूर येथील जिल्हा ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली होती.

लोहारा : महाबीजचे तुरीचे बियाणे सदोष निघाल्याप्रकरणी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याने लातूर येथील जिल्हा ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावर मंचाने शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय दिला होता. परंतु, महाबीजने या निर्णयाविरूद्ध औरंगाबाद विभागीय मंचाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, येथेही महाबीजच्या खात्यात निराशाच पडली. लातूर ग्राहक मंचाचा निकाल कायम ठेवत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.भातागळी येथील शेतकरी अमोल बस्वणप्पा ओंबाडकर यांनी १० जून २००७ रोजी लातूर येथील अंबिका फर्र्टिलायझर्स यांच्याकडून महाबीज अकोला यांचे तुरीचे बियाणे खरेदी केले होते. जवळपास तीन बॅग बियाण्याची दोन हेक्टरवर पेरणी केली होती. दरम्यानच्या काळात बियाण्याची उगवणही चांगली झाली. पीकही जोमदार आले. चांगली प्रकारे फुलेही लागली होती. मात्र, ती लाल आणि पिवळ्या रंगाची होती. त्यामुळे सदरील बियाणे सदोष असल्याची तक्रार जिल्हा बियाणे तक्रार चौकशी समितीकडे केली. त्यानुसार समितीच्या सदस्यांनी १७ नोव्हेंबर २००७ रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे सांगून १ डिसेंबर रोजी तुरीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. परंतु, महाबीज आणि अंबिका फर्टिलायझर्सचे कोणीही हजर राहिले नाही. यावेळी पाहणीमध्ये तुरीचे बियाणे सदोष असल्याचे आढळून आले. त्यानुसार अहवालही सादर करण्यात आला. तुरीच्या काढणीनंतर पिकाचा पंचनामा करण्यात आला. निघालेल्या तुरीचे वजन ११ क्विंटल २५ किलो इतके भरले. शेतकरी ओंबाडकर यांची जमीन चांगल्या प्रतीची असल्यामुळे त्यांना प्रतिकिलो ४ क्विंटल २ किलो असा उतारा मिळणे आवश्यक होते. मात्र त्यांना साडेचौदा क्विंटल कमी उत्पन्न मिळाले. याप्रकरणी त्यांनी लातूर येथील ग्राहकमंचाकडे तक्रार नोंदविली होती. मंचासमोर आलेले साक्षी पुरावे लक्षात घेऊन ग्राहक मंचाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. नुकसान भरपाईपोटी २० हजार रुपये ९ टक्के व्याजदराने तीस दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिले होते. तसेच मानसिक त्रासापोटी दोन हजार रुपये, तक्रारी अर्जाचा खर्च एक हजार रुपये असे तीन हजार रुपये देण्याबाबतही आदेशात नमूद केले होते. या निर्णयाविरुद्ध महाबीज अकोला यांनी विभागीय ग्राहक मंच औरंगाबाद यांच्याकडे अपील केले. मात्र याही कार्यालयाने लातूर ग्राहक मंचाचाच निर्णय जैसे थे ठेवला आहे. त्यामुळे महाबीजसाठी हा एक प्रकारचा झटका मानला जात असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जवळपास ७ वर्षानंतर संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे. (वार्ताहर)