कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी स्विझरलँडच्या उंच माउंट टीटलीस शिखरावर साजरी केली शिवजयंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 19:46 IST2023-02-19T19:46:43+5:302023-02-19T19:46:50+5:30
आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती परिषदे निमित्ताने कृषिमंत्री अब्दुल सत्तार जर्मनी - स्विझरलँड दौऱ्यावर आहेत.

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी स्विझरलँडच्या उंच माउंट टीटलीस शिखरावर साजरी केली शिवजयंती
सिल्लोड : आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती परिषदे निमित्ताने कृषिमंत्री अब्दुल सत्तार जर्मनी - स्विझरलँड दौऱ्यावर आहेत. आज शिवजयंती असल्याने त्यांनी स्विझरलँड येथील माउंट टीटलीस या उंच शिखरावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्विझरलँड येथील माउंट टीटलीस या उंच शिखरावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. pic.twitter.com/eUonDHqC68
— Lokmat (@lokmat) February 19, 2023
याबाबत चा एक व्हिडिओ मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेअर केला असून यात त्यांनी जनतेला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्विझरलँड येथील उंच शिखरावर छत्रपतींची जयंती साजरी करतांना मनस्वी आनंद होत असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा/फोटो हातात घेऊन मंत्री अब्दुल सत्तार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, ग्रामविकास सामाजिक फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी राजाराम दिघे, सिल्लोडच्या नॅशनल सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर यांनी शिवरायांचा जय घोष करीत जयंती साजरी केली.