मावस भावावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:30 IST2019-03-28T22:30:18+5:302019-03-28T22:30:28+5:30

एकाने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री वाळूज एमआयडीसीत घडली.

 Mace attack on brother | मावस भावावर प्राणघातक हल्ला

मावस भावावर प्राणघातक हल्ला

वाळूज महानगर : पत्नीसोबत मोबाईलवर बोलणाऱ्या मावस भावावर संशय घेवून एकाने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री वाळूज एमआयडीसीत घडली. यात रणजीत परदेशी (२८) हा गंभीर जखमी झाला आहे.


रणजीत प्रताप परदेशी हा छत्रपतीनगर येथे वास्तव्यास आहे. तर त्याचा मावस भाऊ संदीप परदेशी हा रांजणगाव येथे कुटुंबासह राहतो. संदीपची पत्नी मनिषा हिच्यासोबत रणजीत हा मोबाईलवर सतत बोलत असल्याच्या कारणावरुन या दोघांत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. रणजीत हा सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सिएट चौकात थांबला होता. रणजीत दिसताच संदीपने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान हल्लेखोर संदीप परदेशी हा फरार झाला आहे. रणजीतला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Mace attack on brother