मराठा सेवा संघातर्फे माँ जिजाऊ व विवेकानंद जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:31+5:302021-01-13T04:10:31+5:30
अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.सुभाष बागल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रमाकांत बेंबडे,उद्योगपती श्रीधर म्हस्के व वैशाली खोपडे ...

मराठा सेवा संघातर्फे माँ जिजाऊ व विवेकानंद जयंती
अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.सुभाष बागल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रमाकांत बेंबडे,उद्योगपती श्रीधर म्हस्के व वैशाली खोपडे यांची उपस्थिती होती. डॉ. बालाजी जाधव यांनी माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रारंभी प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नंतर सविता कदम यांनी जिजाऊ वंदना गायिली. विंग कमांडर टी. आर. जाधव यांनी प्रास्ताविक केले. सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय पाटील यांनी आभार मानले. वैजापूर येथून मोतीभाऊ वाघ व घायवट यांनी आणलेल्या जिजाऊ रथयात्रेचे यावेळी स्वागत करण्यात आले. प्रा. भाऊसाहेब शिंदे, नितीन भोसले, डी. एम. पाटील व दीपक जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
धम्मरत्न मित्रमंडळ..
या मंडळातर्फे टीव्ही सेंटर येथे माँ जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी बुद्ध वंदना घेण्यात आली.विलास पांडे यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ पाखरे यांनी सूत्रसंचालन केले, तर मिलिंद दाभाडे यांनी आभार मानले. धम्म पालन गाथेने कार्यक्रमाचा समारोप झाला. दिलीप रगडे, प्रकाश सोनवणे, सुमेध डोके यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.