वैजापुरात प्रेमी युगुलांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 15:58 IST2018-07-03T15:57:48+5:302018-07-03T15:58:49+5:30
: तालुक्यातील खंबाळा शिवारात प्रेमी युगुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

वैजापुरात प्रेमी युगुलांची आत्महत्या
वैजापूर (औरंगाबाद ) : तालुक्यातील खंबाळा शिवारात प्रेमी युगुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. सागर राहुल म्हेसमाळे ( वय २५ ) आणि साक्षी बाबासाहेब शेजवळ (वय १८) अशी मृतांची नावे असून दोघेही जांबरगाव येथील रहिवाशी होते.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर म्हेसमाळे आणि साक्षी शेजवळ हे तालुक्यातील जांबरगाव राहत असत. साक्षी वैजापुर शहरातील एका कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत होती. यादरम्यान साक्षीचे प्रेमसंबंध गावातील सागर सोबत जुळले होते. मात्र, हे प्रेम प्रकरण त्यांच्या नातेवाईकांना मान्य नसल्याने या दोघांनी आज दुपारी खंबाळा शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली.