पे्रयसीला़़़ प्रेमाचा माहिती अधिकार

By Admin | Updated: September 28, 2014 00:41 IST2014-09-28T00:41:01+5:302014-09-28T00:41:38+5:30

श्रीनिवास भोसले, नांदेड प्रेम का करत नाहीस माझ्यावऱ़़ हे आता मला कळणार आहे़़़ कारण मी आता माहितीचा अधिकार वापरणार आहे़़़

Love information about love for love | पे्रयसीला़़़ प्रेमाचा माहिती अधिकार

पे्रयसीला़़़ प्रेमाचा माहिती अधिकार

श्रीनिवास भोसले,  नांदेड
प्रेम का करत नाहीस माझ्यावऱ़़ हे आता मला कळणार आहे़़़ कारण मी आता माहितीचा अधिकार वापरणार आहे़़़ ही कविता सादर करत नारायण चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्वप्निल मुळे याने काव्यवाचन स्पर्धेत टाळ्या मिळविल्या़ या कवितेतून मुळे यांनी माहितीचा अधिकार व उपयोग याविषयीचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे़
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्त्रीभ्रूण हत्या, राजकारण, समाजकारण, शिक्षण आदी विषयांवरील कविता सादर करीत मने जिंकली़ औंढा येथील नागनाथ महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव पोले याने स्त्रीभू्रण हत्येवर आधारित कविता सादर केली़ यामध्ये स्त्रीचे महत्व आणि जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आदींचा इतिहास उपस्थित केला़ तर इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसीच्या प्रिया देशमुख हिने मैत्रीतील प्रीत कविता सादर करीत मैत्रीचे महत्व पटवून दिले़
एका विद्यार्थ्याने दुनियादारी या कवितेतून मित्राच्या आग्रहातून लागलेले व्यसन, दारू पिण्याचा शोक आणि त्याचा विपरित परिणाम आपल्या कवितेतून मांडला़
कै़ बाबासाहेब गोरठेकर कॉलेज, उमरीच्या श्रीकांत दारेबोईनवाड याने ‘व्यथा’तर सिडको येथील इंदिरा कॉलेजच्या वर्षा खानजोडे हिने बेटीयॉ कविता सादर केली़ ‘इलेक्शन आली भौ इलेक्शन आली़़़सगळेच हाले बदलू लागले पखाली़़़लाल बावटेवाले आता भगव्याचे झाले़़़राजकारणात दिवस भौ नागव्याचे आले’ या इलेक्शनची तयारी़़़ या कवितेतून अहमदपूर येथील यशवंत अध्यापक महाविद्यालयाच्या स्वरूपा चव्हाण हिने आजच्या राजकारणावर प्रखर टीका केली़ लोहा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयातील शेख समीर याने ‘लाचारीचं जगणं’ तर जिजाऊ अध्यापक महाविद्यालय, धनेगाव येथील गजानन डोणे याने स्वप्न पावसातलं़़ ही कविता सादर केली़
‘इथे कुणीही राहिला नाही कुणाचा, स्वार्थाचा वाहतो वारा़़़ रक्ताची भरती नद्या हा खोटारड्यांचा तोरा़़़ अंधश्रद्धेसाठी लढणारे दाभोळकर मात्र इथल्यांना नको आहेत़़़ हत्येस एक वर्ष होऊनही त्यांचा मारेकरी अजूनही मोकाटच आहे़़़ आणि तरीही आम्ही म्हणतो, भारत महासत्ता होणार आहे़़़
कष्टाने पिकवलेल्या मालाला शेतात भाव नाही़़़ वेतनवाढ होते सर्वांचीच पण इथं शेतकऱ्यालाच वाव नाही़़़ पाण्याची गारपीट, दुष्काळाची मारपीट महाराष्ट्रात होते आहे़़़ हवालदिल झालेला शेतकरी गळ्याला फास लावतो आहे़़़आणि तरीही आम्ही म्हणतो भारत ‘महासत्ता’ होणार आहे़़़ अशाप्रकारे विविधांगी काव्यरचनेतून वास्तव मांडण्याचा प्रयत्न नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या अविनाश रामकिशन गायकवाड याने केला़ या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांची साथ दिली़
कॉम्प्युटरच्या चिप सारखा,
माणूस मनाने खुजा झालाय़़़
अन् मदर-फादर नावाचा बोर्ड,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय़
‘विज्ञानयुग’ या कवितेतून कंधार येथील श्री शिवाजी कॉलेजच्या अविनाश कळकेकर याने आधुनिक काळातील यंत्रसामग्री आणि व्यस्त झालेले जीवन मांडताना माणूस नाती विसरत चालला आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला़

Web Title: Love information about love for love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.