दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांमुळे कमळ फुलले
By Admin | Updated: May 18, 2014 01:23 IST2014-05-18T01:02:23+5:302014-05-18T01:23:36+5:30
पैठण विधानसभा मतदारसंघात खा. रावसाहेब दानवे यांच्याबद्दल नाराजी असतानाही त्यांना तालुक्यातून मताधिक्य मिळाले, ही बाब काँग्रेस आघाडीला आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांमुळे कमळ फुलले
पैठण विधानसभा मतदारसंघात खा. रावसाहेब दानवे यांच्याबद्दल नाराजी असतानाही त्यांना तालुक्यातून मताधिक्य मिळाले, ही बाब काँग्रेस आघाडीला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. महायुतीच्या दुसर्या फळीतील कायकर्त्यांना व तरुणांना दानवे यांनी पकडून प्रचार करून घेतला. त्यात मोदी लाट असल्याने ‘कमळ’ फुलले. आ. संजय वाघचौरे यांच्याविषयीची नाराजीही काँग्रेस आघाडीला भोवली. जालना लोकसभा मतदारसंघातून खा. रावसाहेब दानवे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर तालुक्यात प्रचंड नाराजी पसरली होती. यामुळे काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना पैठणकडून खूप आशा वाटली. त्यांनी यासाठी परिश्रमही घेतले; परंतु तालुक्यातील काँग्रेस व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांत एकी नसल्याने आघाडी प्रचारात प्रभाव पाडू शकली नाही. त्यात आ. संजय वाघचौरे यांनी केलेल्या प्रचाराचा फायदा आघाडीला झाला नाही. कारण वाघचौरे यांच्याविषयी तालुक्यात प्रचंड रोष आहे. महायुतीचे पहिल्या फळीतील दिग्गज दानवेंवर नाराज असले तरी त्यांनी शेवटी काम केले; परंतु धूर्त दानवेंनी दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांकरवी प्रचार करून घेतल्याने महायुतीचे मताधिक्य वाढण्यास मदत झाली. पैठणने नेहमीप्रमाणे आघाडीच्या पाठीशी भक्कम साथ दिली. त्याचा आता आगामी विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होईल, याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महायुतीचे यश काँग्रेस आघाडीस गांभीर्याने घ्यावे लागणार, हे मात्र स्पष्ट आहे. की फॅक्टर काय ठरला? महायुतीच्या दुसर्या फळीतील कायकर्त्यांना व तरुणांना दानवे यांनी पकडून प्रचार करून घेतला. त्यात मोदी लाट असल्याने ‘कमळ’ फुलले. आ. संजय वाघचौरे यांच्याविषयीची नाराजीही काँग्रेस आघाडीला भोवली. स्वत: मतदारच मोदी लाटेमुळे उत्साहाने मतदान करायला गेला, हेही विसरून चालणार नाही. आघाडीमधील अतिआत्मविश्वासही नडल्याने औताडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. औताडे यांनी तालुक्यातील ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांना मतदारांनी लाथाळले, हे निकालानंतर औताडेंना कळून चुकले. तालुक्यातील महायुतीच्या इच्छुकांच्या आशेला अंकुर मात्र फुटले. माजी आमदार संदीपान भुमरे यांची भूमिकाही दानवेंसाठी फायद्याची ठरली. तालुक्यातून दानवे यांना जे मतदान झाले ते फक्त मोदी लाटेमुळेच.