शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दर्जावाढ रद्दच्या आदेशाला ‘खो’!

By admin | Updated: February 9, 2015 00:45 IST

संजय तिपाले , बीड आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ६३ शिक्षकांनी नियमबाह्यपणे दर्जावाढ पदरात पाडून घेतल्या होत्या. सीईओंनी दर्जावाढ रद्दचे आदेश काढत शिक्षकांना दणका देण्याचा प्रयत्न केला;

संजय तिपाले , बीडआंतरजिल्हा बदलीने आलेल्या ६३ शिक्षकांनी नियमबाह्यपणे दर्जावाढ पदरात पाडून घेतल्या होत्या. सीईओंनी दर्जावाढ रद्दचे आदेश काढत शिक्षकांना दणका देण्याचा प्रयत्न केला; परंतु दर्जावाढीने रुजू झालेले ठिकाण शिक्षकांना सोडवत नाही. सीईओंच्या आदेशालाही ‘खो’ देत आहे तेथेच ठाण मांडून शिक्षकांनी ‘शाळा’ सुरु केली आहे.२०१३ व २०१४ मध्ये आंतरजिल्हा बदलीने ९०० हून अधिक शिक्षक जिल्ह्यात आले होते. आॅगस्ट २०१४ मध्ये जिल्हा परिषदेत शिक्षकांना दर्जावाढ देण्यात आली होती. मात्र, दर्जावाढ देताना नियमांना फाटा देण्यात आला होता. खिरापतीप्रमाणे दर्जावाढ बहाल करत अक्षरश: ‘बाजार’ मांडला होता. त्यामुळे दर्जावाढीविरुद्ध तक्रारीही झाल्या होत्या. दरम्यान, आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता बीडमध्ये आल्यानंतर ‘झिरो’ झालेली असतानाही तब्बल ६३ सहशिक्षक दर्जावाढीने प्राथमिक पदवीधर झाले होते. त्यांनी केवळ दर्जाचा वाढवून घेतला नाही तर सोबत त्या पदाची वेतननिश्चतीही करून घेतली. सीईओ नामदेव ननावरे यांनी २० जानेवारी २०१५ रोजी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या दर्जावाढ रद्द करत जोरदार हादरा दिला होता;पण या आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे नियमबाह्य दर्जावाढ प्राप्त करणारे शिक्षक आहे त्या शाळांमध्येच कार्यरत आहेत. प्राथमिक पदवीधरांच्या जागेवर त्यांनी ठाण मांडल्याने या पदासाठीच्या मूळ दावेदारांची अडचण झाली आहे. दर्जावाढ प्राप्त करताना मोठी ‘उलाढाल’ झाली. त्यामुळे दर्जावाढीचे पद सोडून मूळ पदावर येण्यास काही शिक्षक अनुत्सूक असल्याचे सांगितले जात आहे.गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविलेशिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप म्हणाले, सीईओंनी दिलेले आदेश सामान्य प्रशासन विभागातून थेट तालुक्यांना गेले होते. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दर्जावाढ रद्दच्या आदेशानुसार कार्यवाही करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. अनुपालन अहवालही मागविला आहे.