शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक साहित्यातून बदलणार शाळांचा ‘लूक’

By admin | Updated: December 23, 2015 23:55 IST

बीड : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांच्या चाकोरीत न घडविता त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी ज्ञानरचनावादी शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

बीड : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांच्या चाकोरीत न घडविता त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी ज्ञानरचनावादी शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या कल्पनेतून विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती केली जाणार आहे. यामुळे शाळांना शैक्षणिक वातावरणाचा ‘लूक’ मिळणार आहे.विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा व चिकित्सावृत्ती वाढीस लागण्यास मदत व्हावी, यासाठी २२ जून २०१५ रोजी शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाची घोषणा केली. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी अध्यापनात अडकवून न ठेवता त्यांना व्यवहारज्ञान व समाजभान मिळावे यासाठी रचनात्मक शिक्षण पद्धती पुढे आली. विद्यार्थी केवळ अभ्यासू असून चालणार नाही तर तो सर्व कसोट्यांवर उतरला पाहिजे हा उद्देश समोर ठेवून आता शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्याबरोबरच नवनवीन बाबी आत्मसात केल्या पाहिजेत. त्यासाठी विज्ञान, गणित व भाषाविषयक अभ्यासक्रमांमधील साहित्याची निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे. टाकाऊपासून टिकावू, रंगांमधून विविध चित्रे, भिंतींची रंगरंगोटी आदी कलाविष्कार साकारण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. याकरता शिक्षणप्रेमी नागरिकांसह कलावंतांचीही मदत घेणार आहे. तीन दिवस कार्यशाळाशैक्षणिक साहित्य निर्मितीबाबत शिक्षकांसाठी बुधवारपासून तीन दिवसीय कार्यशाळांना सुरुवात झाली आहे. सलग सुट्यांमध्येच ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)