शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

लोणीकर व खोतकर यांची वर्णी अपेक्षित

By admin | Updated: December 5, 2014 00:59 IST

जालना: शिवसेना व भारतीय जनता पक्षात अखेर गुरुवारी सत्तेतील वाट्याबाबत समेट घडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला.

जालना: शिवसेना व भारतीय जनता पक्षात अखेर गुरुवारी सत्तेतील वाट्याबाबत समेट घडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, या विस्तारात या जिल्ह्यातील आ. बबनराव लोणीकर (भाजप) व आ. अर्जुन खोतकर (शिवसेना) या दोघांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे चित्र आहे.या जिल्ह्यास केंद्रिय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे राजकीय क्षेत्रासह जिल्ह्यात मोठा आनंद व्यक्त झाला. या पार्श्वभूमीवरच विधानसभा निवडणुका आल्या. त्यातही भाजपाने पाचपैकी तीन जागा पटकावून मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळेच राज्यातील सत्ता परिवर्तनात या जिल्ह्यास निश्चितपणे वाटा मिळणार अशी चिन्हे होती. त्याप्रमाणे भाजप पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष तथा आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासंदर्भात जवळपास निर्णय घेतला आहे. तसे स्पष्ट संकेत सुध्दा दिले आहेत. लोणीकर हे परतूरमधून निवडून आले आहेत. ते तिसऱ्यांदा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. १९९९ व २००४ च्या निवडणुकीत ते सलग दोन वेळा विजयी झाले होते. २००९ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. परंतु गेल्या निवडणुकीत पराभावाचा लोणीकर यांनी या निवडणुकीत वचपा काढला.त्यामुळेच भाजपातील त्यांची ज्येष्ठता ओळखूनच राज्यमंत्री मंडळात वर्णी लागणार हे स्पष्ट आहे. (प्रतिनिधी)४राज्यात शिवसेनेच्या सहकार्याने भाजपाने सत्ता हस्तगत केल्यास या जिल्ह्यास शिवसेना श्रेंष्ठीकडूनही सत्तेत वाटा दिला जाईल असे चित्र होते. परंतु या दोन्ही पक्षातील श्रेष्ठीत सत्तेतील वाट्यासंदर्भात दीर्घकाळ खलबत्ते रंगली. त्यातून वार्तावरण सुध्दा गढुळ झाले. अखेर गुरुवारी या दोन्ही पक्षांनी समन्वयातून सत्तेतील वाटा निश्चित केला. त्यामुळे आता या जिल्ह्याला शिवसेनेच्या रुपाने सुध्दा सत्तेत वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजीमंत्री अर्जुन खोतकर हे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळेच त्यांचीच वर्णी अपेक्षित आहे.