शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:13 IST

नारेगावमधून काही तासांत अटक; एटीएससह गुप्तचर यंत्रणांकडून समांतर तपास सुरू

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एक्सीडी इंडिया लि. कंपनीत तीन महिन्यांपूर्वीच रुजू झालेल्या शेख उमर शेख गफार (२२, रा. आयेशा पार्क, नारेगाव) याने केशरी रंगाच्या पेंटने 'पाकिस्तान जिंदाबाद' असे वाक्य लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी रात्री कंपनीने याप्रकरणी तक्रार देताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्याला मध्यरात्री १२ वाजता घरातून अटक केली.

१९ मे रोजी कंपनीच्या असेंब्ली विभागाच्या ९५२ क्रमांकाच्या इमेज मार्किंग मशिनवर रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांना सदर मजकूर इंग्रजीत लिहिलेला आढळून आला होता. त्यांनी तत्काळ सुरक्षा अधिकाऱ्यांना याचा व्हिडिओ पाठवला. २० मे रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. त्यात काही कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुसऱ्या पाळीत काम करणारा उमर बराच वेळ त्या मशिनजवळ बसलेला दिसल्याचे सांगितले. उमरला याबाबत विचारणा केली असता त्याने हे कबूल केले. कंपनीने याबाबत निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्याकडे तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य पाहता निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी वरिष्ठांना ही बाब कळवून तपास सुरू केला. मध्यरात्री १२ वाजता त्याला त्याच्या घरातून अटक केली. न्यायालयाने त्याला २५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे निरीक्षक कल्याणकर यांनी सांगितले.

एटीएस, गुप्तचर यंत्रणेचा या मुद्यांच्या आधारे तपास-उमरचे कृत्य देशद्रोही असून, असे लिहिण्याचा त्याचा उद्देश काय होता?-असे लिहिण्यासाठी उमरला कोणी प्रोत्साहित केले का? तो देशविरोधी व्यक्तीच्या संपर्कात आहे का?-देशाच्या शत्रू राष्ट्राबाबत आकर्षण निर्माण होण्यासाठी कोणती शक्ती, संघटना कारणीभूत आहे?-उमरचा मोबाइल, सोशल मीडिया अकाऊंट तपासून देशविघातक संघटना किंवा व्यक्तींच्या संपर्कात आहे का?

सिमकार्डचे रिकामे पाकीट, अनेक ई-मेल अकाऊंट्सपोलिस, एटीएसकडून उमरच्या घराची तपासणी करण्यात आली. त्यात सिमकार्डचे रिकामे पाकीट, दोन सिमकार्ड, एटीएम कार्ड, बँक पासबुक सापडले. पोलिसांनी ते जप्त केले. उमरच्या मोबाइलमध्ये एकापेक्षा अधिक ई-मेल अकाऊंट्स आहेत. त्याचे तज्ज्ञांकडून विश्लेषण केले जात आहे.

संघटनेमार्फत नियुक्तीबी.कॉम.च्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असलेला उमर तीन महिन्यांपूर्वीच शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्त झाला. कंपनीला पुण्याच्या युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे हे शिकाऊ उमेदवार पुरवले जातात. उमरचे कुटुंब सर्वसाधारण असून त्याचे वडील एका खासगी कंपनीत कामगार असून आई गृहिणी आहे.

यापूर्वी 'नारेगाव' कनेक्शन समोरदेशविघातक कृत्य प्रकरणात यापूर्वी नारेगाव गुप्तचर यंत्रणांच्या तपासात केंद्रस्थानी राहिले आहे. काही वर्षांपूर्वी केंद्रीय गुप्तचर खाते व एनआयएच्या संयुक्त कारवाईत एका प्रतिबंधित संघटनेने देशविघातक कृत्यासाठी नारेगावमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले होते. एका पत्र्याच्या शेडमध्ये हे प्रशिक्षण पार पडले होते. त्या अनुषंगानेदेखील आता नव्याने तपास केला जाणार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAnti Terrorist SquadएटीएसPakistanपाकिस्तानPoliceपोलिस