शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दारू परवाने वाटले खिरापतीप्रमाणे

By admin | Updated: January 7, 2015 01:02 IST

बीड : मागील तीन महिन्यांत ५० बिअर शॉपी, परमिट रूम, देशी विदेशी दारू विक्रीला येथील राज्य उत्पादक शुल्क कार्यालयातून मान्यता देण्यात आली़

बीड : मागील तीन महिन्यांत ५० बिअर शॉपी, परमिट रूम, देशी विदेशी दारू विक्रीला येथील राज्य उत्पादक शुल्क कार्यालयातून मान्यता देण्यात आली़ तीन महिन्यांत जिल्ह्यात ५० दुकानदारांना परवाने देताना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे की नाही याविषयी शंका निर्माण होत आहे़ एकीकडे उत्पादन शुल्क कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे तर दुसरीकडे परवाना देण्याचा सपाटा दणक्यात सुरू आहे़ येथील उत्पादन शुल्क कार्यालयात इन्स्पेक्टरची सर्वच पदे रिकामी आहेत़ त्यामुळे अवैध दारू विक्रीवर छापे कोण टाकणार असा प्रश्न निर्माण होत आहे़ इतर कामांना कर्मचारी कमी असल्याचा बाऊ येथील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून केला जातो़ दुकानांना परवाने देताना मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता भासत नाही याचा ‘अर्थ’ काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे़दारू विक्री परवाना देताना १६ ते १७ प्रकारची प्रमाणपत्रे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला देणे आवश्यक आहे़ मात्र, या कागदपत्रांची पूर्तता संबंधित यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून करून घेतली जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले़याबाबत संबंधित प्रभारी अधीक्षक के़जी़राऊत यांच्याशी संपर्क झाला नाही़ (वार्ताहर)