शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स परिवार सामूहिक जबाबदारीमुळेच यशस्वी

By admin | Updated: June 13, 2016 00:44 IST

औरंगाबाद : चिकलठाणा लायन्स क्लबच्या अथक परिश्रमामुळे व लायन्स परिवाराच्या सामूहिक जबाबदारीमुळे लायन्स आय हॉस्पिटल एव्हरेस्टपदी पोहोचले आहे

औरंगाबाद : चिकलठाणा लायन्स क्लबच्या अथक परिश्रमामुळे व लायन्स परिवाराच्या सामूहिक जबाबदारीमुळे लायन्स आय हॉस्पिटल एव्हरेस्टपदी पोहोचले आहे. भविष्यात ते दीपस्तंभाची जागा घेईल, असे गौरवोद्गार लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी रविवारी काढले. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अल्पावधीतच पूर्ण करण्याचे अभिवचनदेखील त्यांनी यावेळी दिले. यावेळी इंटरनॅशनल डायरेक्टर नरेंद्र भंडारी म्हणाले, हे हॉस्पिटल मराठवाड्यातच नव्हे तर देशात अद्ययावत ठरेल. हॉस्पिटलसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक योगदान मिळावे, यासाठी सक्रिय प्रयत्न करावे लागतील. राजेश भारुका म्हणाले, हॉस्पिटलमध्ये सध्या महिन्याला ५०० सर्जरी होत आहेत. या सर्जरी ७०० पर्यंत नवीन प्रकल्पामुळे होतील. मधुमेहासाठी प्रकल्प उभारला जावा, असा मानस प्रांतपाल एम. के. अग्रवाल यांनी व्यक्त केला. २०१७ पर्यंत हा प्रकल्प सर्वांच्या मदतीने पूर्ण होईल. हॉस्पिटलचे अध्यक्ष बी. एस. राजपाल म्हणाले, आजचा दिवस क्लबसाठी गौरव सोहळा आहे. आजवर दहा हजारांवर सर्जरी या हॉस्पिटलमध्ये झाल्या आहेत. ७० टक्के आॅपरेशन नि:शुल्क करीत आहोत. नवीन प्रकल्पानंतर कार्यक्षमता वाढून जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळेल. लायन्सचे उपप्रांतपाल संदीप मालू, पूर्व प्रांतपाल तनसुख झांबड, कोषाध्यक्ष संजीव गुप्ता, प्रकाश राठी, सुरेश बाफना, सावित्री बाफना, रवींद्र करवंदे, राजेश लहुरीकर, राजेंद्र लोहिया, एस. एम. अग्रवाल, पंकज फुलपगर, राजकुमार टिबडीवाला, विमल टिबडीवाला, रमेश पोखर्णा, हर्षवर्धन जैन, कांतीलाल कांकरिया, जी. एम. बोथरा, प्रसिद्धीप्रमुख अ‍ॅड. शांतीलाल छापरवाल, डॉ. बायस, पवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गोठी, जयकुमार थानवी यांनी केले. आभारप्रदर्शन सचिव विनोद चौधरी यांनी केले. हॉस्पिटलच्या नवीन प्रकल्पासाठी २ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. लायन्स परिवाराच्या सक्रिय योगदानातूनच हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल. त्यामुळे सर्वांनी प्रकल्पासाठी सक्रिय असे योगदान द्यावे, असे आवाहन भूमिपूजनप्रसंगी करण्यात आले.