शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायत समाजाचे धरणे

By admin | Updated: July 16, 2014 00:48 IST

नांदेड : महाराष्ट्र वीरशैव सभा शाखा नांदेडच्या पुढाकारातून लिंगायत संघर्ष समिती व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत परिषद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी सवलती

नांदेड : महाराष्ट्र वीरशैव सभा शाखा नांदेडच्या पुढाकारातून लिंगायत संघर्ष समिती व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत परिषद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी सवलती मिळविणे, वीरशैव लिंगायत समाजास वेगळा धर्म समजून अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले़राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार वाणी समाजास ओबीसीच्या सवलती मिळतात़ परंतु रोटी-बेटी व्यवहार व रक्तनाते एकच असताना सुद्धा लिंगायत, वीरशैव, लिंगायत वाणी, लिंगडेर आदी पर्यायी वाचक शब्दांच्या जातीच्या रकान्यात उल्लेख असल्यामुळे बहुसंख्य लिंगायत समाज वंचित आहे़ त्यामुळे या सर्वांना वाणी संबोधून त्यांना ओबीसीच्या सवलती मिळवून देण्याची मागणी करण्यात आली़ यावेळी आ़ ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ़ गंगाधरराव पटणे, माजी आ़ ईश्वरराव भोसीकर, हरिहरराव भोसीकर, माधवराव पांडागळे, माजी सभापती किशोर स्वामी, वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हुरणे, सेना जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर, शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, जि़ प़ सदस्य संजय बेळगे, बचूराज देशमुख, अनिल पाटील खानापूरकर, नागनाथ पाटील सावळीकर, हनमंतराव मस्कले, माजी सभापती दिलीप कंदकुर्ते, खुशाल पाटील उमदरीकर, विश्वनाथ देशमुख, योगेश बुरांडे, राजन मिसाळे, बाबूराव देशमुख कौठेकर, डॉ़ नीळकंठ भोसीकर यांची उपस्थिती होती़सूत्रसंचालन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश मारकोळे - पाटील यांनी केले़ (प्रतिनिधी)पालकमंत्री डी़पी़सावंत यांनी धरणे आंदोलनास उपस्थित राहून बुधवारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ मागून घेणार असल्याचे सांगितले़ तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकप्रतिनिधी व समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून आवश्यक तो बदल करुन हा विषय सोडविण्याचे आश्वासन दिले़ मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी श्री केदार जगदगुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला़