शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घातला! अंजना नदीच्या पुरात बाईक वाहून गेली, चालक थोडक्यात बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:31 IST

सिल्लोड तालुक्यातील उपळी गावाजवळील घटना

- प्रमोद शेजुळभराडी (प्रतिनिधी): अंजना नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना त्यातून बाईक नेण्याचा धोका पत्करणे येथील एका चालकाला चांगलेच महागात पडले. मंगळवारी (दि. ३०) ही घटना घडली असून, पुराच्या तीव्र प्रवाहामुळे मोटारसायकल वाहून गेली, मात्र सुदैवाने चालक थोडक्यात बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपळी येथील रमेश पंडितराव शेजुळ हे काही कामानिमित्त भराडी येथे जात होते. अंजना नदीवरील पुलावरून पाणी वाहत असतानाही त्यांनी बाईक पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीच्या तीव्र प्रवाहामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ते खाली पडले. त्यांच्या डोळ्यांदेखत मोटारसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली. मात्र, प्रसंगावधान राखून रमेश शेजुळ यांनी स्वतःला वाचवले आणि ते सुरक्षित स्थळी पोहोचले.

इशारे देऊनही बेपर्वाईउपळी येथील गावकऱ्यांनी यापूर्वीही नदीला पूर आल्यास पुलावरून वाहने न नेण्याचा इशारा दिला होता आणि अनेकदा सूचनाही लावल्या होत्या. मात्र, काही वाहनचालक या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालत असल्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा वाहतूकदारांना पाण्याचा अंदाज न घेता धोका पत्करू नका, असे आवाहन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bike swept away in Anjana River flood; driver survives narrowly.

Web Summary : A man risked crossing a flooded bridge on the Anjana River, resulting in his bike being swept away. The driver, Ramesh Shejul, narrowly escaped with his life after losing control due to the strong current. Despite warnings, such incidents persist, prompting villagers to urge caution.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfloodपूरRainपाऊस