शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा स्तर उंचवेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:04 AM

औरंगाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित दर कमी होत नसल्यामुळे स्तर तीनवरून एकपर्यंत जाण्यास यंत्रणेला परिश्रम घ्यावे लागणार ...

औरंगाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित दर कमी होत नसल्यामुळे स्तर तीनवरून एकपर्यंत जाण्यास यंत्रणेला परिश्रम घ्यावे लागणार आहेत. स्तर उंचावत नसल्यामुळे ग्रामीण भागातील लॉकडाऊन सध्या ‘जैसे थे’ आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थांच्या सहभागातून यंत्रणांनी चाचणी मोहीम सक्रियपणे राबविण्याच्या सूचना बुधवारी एका बैठकीत दिल्या.

ग्रामीण भागातील संसर्गाचे प्रमाण कमी करून शहराप्रमाणे जिल्ह्याचा ग्रामीण भागही स्तर एकमध्ये आणण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी कोविड चाचण्या वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. गावामध्ये सर्व व्यापारी, दुकानदार, विक्रेते, धार्मिक विधी करणाऱ्यांसह सर्वांच्या चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवावे. जेणेकरून ग्रामीणचा बाधित दर कमी होण्यास मदत होईल. ब्रेक दी चेन अंतर्गत सध्या शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांव्यतिरिक्त सर्व बाबी खुल्या केल्या आहेत.

यापुढे १०० टक्के चाचणी करणाऱ्या व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांचा गौरव करावा. लस घेतलेल्यांना चाचण्यांमधून सूट द्यावी. लस घेतलेल्यांमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांची चाचणी करणे बंधनकारक आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भाग स्तर तीनमधून स्तर एकमध्ये आणता येईल. या उद्देशाने सर्व यंत्रणांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केेले.

जिल्ह्यात १०.८० टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण

वैद्यकीय अहवालाच्या आधारे ११ जून ते १४ जून दरम्यान शहर क्षेत्रात रुग्णांची पॉझिटीव्हीटी टक्केवारी ०.४५ टक्के व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी ४.२७ टक्के आहे. कोरोना रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड १०.८० टक्के आहेत.

रविवारपर्यंत चाचणीसाठी डेडलाईन

व्यापारी मालक, कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी, विनाचाचणी कोणत्याही दुकानदाराला, व्यापाऱ्याला व्यवसाय, विक्री करता येणार नाही. यासाठी सर्व संबंधितांनी येत्या रविवारच्या आत चाचण्या करणे बंधनकारक आहे. विना चाचण्या दुकान उघडणाऱ्यांवर स्थानिक यंत्रणांनी तातडीने कारवाई करून दुकान सील करावीत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.