आला व्हिडिओ कर 'फॉरवर्ड'; बिबट्यांचा वावर नाशिकला, अफवा छत्रपती संभाजीनगरात
By साहेबराव हिवराळे | Updated: August 2, 2023 18:50 IST2023-08-02T18:43:00+5:302023-08-02T18:50:04+5:30
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता, ते सर्व व्हिडीओ नाशिकच्या भवानीनगरातील असल्याचे निदर्शनास आले.

आला व्हिडिओ कर 'फॉरवर्ड'; बिबट्यांचा वावर नाशिकला, अफवा छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगर : शहरातील भवानीनगरात बिबट्या दिसल्याची अफवा सोशल मीडियावर व्हिडीओ टाकल्याने सोमवारी रात्रीपासून सुरू झाली, ती मंगळवारीही प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करीत होती, परंतु सोशल मीडियावर ‘सरकाव’ नीतीमुळे ‘आला व्हिडीओ की पाठव दुसऱ्याला’ अशीच सवय बळावली आहे. त्याचा मनस्ताप शहरातील नागरिकांना सहन करावा लागला.
वनविभागाच्या परीक्षा सुरू असून, अधिकारी त्या कामात असतानाच त्यांचाही ताण वाढला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता, ते सर्व व्हिडीओ नाशिकच्या भवानीनगरातील असल्याचे निदर्शनास आले. अफवांवर विश्वास ठेवू नये, विनाकारण अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितले.