समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; पहाटेच्या सुमारास घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:00 IST2025-04-13T11:55:25+5:302025-04-13T12:00:42+5:30

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा एमआयडीसी जंक्शन जवळील घटना

Leopard killed in collision with unknown vehicle on Samruddhi Highway at Chhatrapati Sambhajinagar | समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; पहाटेच्या सुमारास घडली घटना

समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; पहाटेच्या सुमारास घडली घटना

करमाड:  समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा एमआयडीसी जंक्शन जवळील जयपुर शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने एक बिबट्या ठार झाला. सदर घटना ही रविवारी पहाटे उघडकीस आली. 

१३ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेला समृद्धी महामार्गावरील सुरक्षा रक्षकांना महामार्गावर मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क करून या घटनेबाबत बद्दल माहिती दिली. संभाजीनगर येथील वनविभागाच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला शिवविच्छेदनासाठी शेंद्रा एमआयडीसीला लागून असलेल्या वनविभागाच्या कुंभेफळ शिवारातील नर्सरी मध्ये हलविले.

Web Title: Leopard killed in collision with unknown vehicle on Samruddhi Highway at Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात