विधानपरिषद निवडणूक : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाण यांना २५ हजार मते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 18:14 IST2020-12-03T18:13:35+5:302020-12-03T18:14:00+5:30

Marathwada Graduate Constituency Election : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मतदान केले आहे.

Legislative Council Election: 25,000 votes to Satish Chavhan of Mahavikas Aghadi in the first round | विधानपरिषद निवडणूक : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाण यांना २५ हजार मते 

विधानपरिषद निवडणूक : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाण यांना २५ हजार मते 

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीत पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना २५ हजार मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत एकूण ५६ हजार मतांची मोजणी झाली असून इतर मतांची विभागणी भाजपचे शिरीष बोराळकर आणि अपक्ष सिद्धेश्वर मुंडे आणि रमेश पोकळे यांच्यात झाली आहे. 

पहिल्या फेरीत ५,५०० मते अवैध ठरली आहेत. यात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना जवळपास ११ हजार मतांची आघाडी असल्याची माहिती आहे. यात पोस्टल मतांची सुद्धा गणना करण्यात आली आहे. 

विजयाचा कोटा अद्याप निश्चित झाला नाही. ५६ टेबलवर मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार असून त्यामध्ये वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरेल. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात १ अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येईल. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होताच सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका या एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतर दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी करण्यात येईल. हे करीत असतानाच वैध मतपत्रिका काढण्यात येतील. त्यानंतर ३५ उमेदवारांच्या पसंतीनुसार मतपत्रिका पिजन बॉक्समध्ये वर्ग करण्यास सुरुवात होईल. येथूनच खरी मतमोजणी सुरू होईल. या सगळ्या प्रक्रियेला रात्री ८ वाजेपर्यंत वेळ लागेल. तोपर्यंत वैध मतांचा कोटा आणि विजयासाठी लागणाऱ्या एकूण मतदानाचा आकडा समोर येईल.

Web Title: Legislative Council Election: 25,000 votes to Satish Chavhan of Mahavikas Aghadi in the first round