शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलसाठी घर सोडले, काम मिळेना, पैसे संपले; मुलाने स्वतःहून वडिलांना केला संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:43 IST

'मोबाइल नको, अभ्यास कर' वडिलांनी रागावल्याने अकरावीतील मुलाची पुण्यात धाव

छत्रपती संभाजीनगर: 'मोबाइलवर नको, अभ्यास कर' असे वडिलांनी रागावल्यामुळे एका १६ वर्षीय अकरावीत शिकणाऱ्या मुलाने शनिवारी (दि. १३) रात्रीतून थेट घर सोडल्याची धक्कादायक घटना सिडको भागात उघडकीस आली आहे. मुलगा रागाच्या भरात पुण्यात पोहोचल्याचे कळताच, कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि वडिलांनी तातडीने पुण्यात धाव घेत मुलाला परत आणले.

जालना जिल्ह्यातील हे कुटुंब सध्या आपल्या १६ वर्षांच्या मुलासह सिडको परिसरात वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास वडील कामावरून घरी आले. त्यावेळी त्यांचा अकरावीत शिकणारा मुलगा मोबाइल बघत बसलेला होता. वडिलांनी त्याला 'मोबाइल बघू नको, अभ्यास कर' असे सांगून दिवसभर कुठे गेला होता याबद्दल रागावले. वडिलांचे हे बोलणे मुलाने मनाला लावून घेतले. रात्री साडेबारापर्यंत मुलगा घरी झोपलेला होता, मात्र सकाळी साडेपाच वाजता पाहिले तेव्हा तो घरातून निघून गेला होता.

फोन आला, जीवात जीव आलामुलगा घरात दिसला नाही, तेव्हा कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी सर्वत्र मुलाचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर वडिलांनी सिडको पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली आणि गुन्हा दाखल झाला. पैसे संपल्यानंतर मुलाने स्वतः वडिलांना फोन करून तो पुण्यात असल्याचे सांगितले. काम शोधण्यासाठी एका कंपनीत गेला होता, असे त्याने वडिलांना सांगितले. मुलगा पुणे येथे असल्याचे समजताच, चिंतेत असलेल्या वडिलांच्या जीवात जीव आला. त्यांनी तातडीने सिडको पोलिसांना माहिती दिली आणि मुलाला घेण्यासाठी पुण्याची वाट धरली.

English
हिंदी सारांश
Web Title : Scolded for Phone Use, Teen Flees Home, Reaches Pune

Web Summary : An Aurangabad teen ran away after being scolded for using his phone. He went to Pune seeking work, but called his father when his money ran out. The relieved father retrieved him with police help.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी