शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला सोडचिठ्ठी द्या, अन्यथा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:58 IST

शिवसेनेने शनिवारी राजकीय अस्त्र बाहेर काढले. भाजपच्या इशाºयावर नाचणे बंद न केल्यास अविश्वास ठरावाच्या हालचालींना वेग देण्यात येईल, असा सज्जड दम आयुक्तांना भरण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने भाजपच्या काही ‘विशेष’ पदाधिकाºयांच्या सांगण्यावरून धूमधडाक्यात निर्णय घेणे सुरू केले. या निर्णयप्रक्रियेत शिवसेनेला सोबत घेण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेनेने शनिवारी राजकीय अस्त्र बाहेर काढले. भाजपच्या इशाºयावर नाचणे बंद न केल्यास अविश्वास ठरावाच्या हालचालींना वेग देण्यात येईल, असा सज्जड दम आयुक्तांना भरण्यात आला आहे.महापालिकेत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. सत्तेसाठी शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी भाजपसोबत युती केली. मागील काही महिन्यांपासून भाजपने सेनेला डिवचण्याची कोणतीच संधी सोडलेली नाही. प्रत्येक वेळी सेनेने नमते घेतले. युतीधर्म एकट्या शिवसेनेकडूनच पाळण्यात येऊ लागला. महापालिकेतील निर्णयप्रक्रियेतून सेनेला चक्क बाजूला करण्यात आले. भाजपमधील काही ‘विशेष’ पदाधिकाºयांनी भोकरदनमार्गे आयुक्तांवर अगोदर दबाव निर्माण केला. त्यानंतर सोयीनुसार मोठ-मोठे निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडले.पालकमंत्री रामदास कदम यांनी भ्रष्ट अधिकाºयांना सेवेत घेऊ नका म्हटले की, दुसºयाच दिवशी अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली. पालकमंत्री शहरात आलेले असतानाही मनपातील वरिष्ठ अधिकाºयांनी त्यांच्या दौºयाकडे पाठ फिरविली. मागील काही दिवसांतील अनेक निर्णय सेनेच्या जिव्हारी लागले आहेत. सेनेच्या संयमाचा बांध शनिवारी फुटला. उपमहापौर स्मिता घोगरे आणि सभागृहनेता गजानन मनगटे यांनी शनिवारी दुपारी आयुक्तांची अ‍ॅन्टी चेंबरमध्ये भेट घेतली. या भेटीत अप्रत्यक्षपणे दोन्ही पदाधिकाºयांनी आयुक्तांना इशारा दिला की, यापुढे भाजपसोबत वाढलेले प्रेम आणि जिव्हाळा कमी करा; अन्यथा परिणाम वाईट होतील. यापूर्वी सेनेनेच आघाडी घेत तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता.महापौर निवडणुकीचेही निमित्त...भाजपने महापौर निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली आहे. यंदा महापौरपद सेनेच्या कोट्यात आहे. सेनेकडून हे पद हिसकावून घेण्याची भाषा भाजप नेत्यांकडून सुरू आहे. महापालिकेत शिवसेना म्हणेल तीच दिशा...असते हे दाखवून देण्यासाठी शनिवारी शिवसेनेनेही कंबर कसून विरोध दर्शविण्यास सुरुवात केली.