३१४ रूग्णांना सुटी, १९३ रूग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 13:32 IST2020-10-02T13:32:17+5:302020-10-02T13:32:59+5:30
मागील काही दिवसांपासून सातत्याने काेरोना रूग्ण नव्याने सापडण्याच्या आकड्यांपेक्षा कोरोनामुक्त होत असलेल्यांचा आकडा जास्त येत असल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळत आहे.

३१४ रूग्णांना सुटी, १९३ रूग्णांची वाढ
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी ३१४ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर दिवसभरात १९३ रूग्णांची नव्याने भर पडली आहे. इतर जिल्ह्यांतील ३ आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात गुरूवारी आढळलेल्या नव्या १९३ रूग्णामध्ये ग्रामीण भागातील रूग्ण ४४ असून मनपा हद्दीतील ८१ आणि अन्य ठिकाणचे ६८ रूग्ण आहेत. या रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३३, ८४१ झाली असून या रूग्णांपैकी २७, ८१४ रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत ९४२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५, ०८५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
मागील काही दिवसांपासून सातत्याने काेरोना रूग्ण नव्याने सापडण्याच्या आकड्यांपेक्षा कोरोनामुक्त होत असलेल्यांचा आकडा जास्त येत असल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळत आहे.