शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराची शेवटची सभा व्हायची गणेशपार मोंढा भागातच

By admin | Updated: June 4, 2014 01:29 IST

संजय खाकरे , परळी विधानसभा असो की लोकसभा, नगर परिषद असो की बँक निवडणुका; खा. मुंडे यांची प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा गणेशपार आणि मोंढ्यात ठरलेली असायची.

 संजय खाकरे , परळी विधानसभा असो की लोकसभा, नगर परिषद असो की बँक निवडणुका; खा. मुंडे यांची प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा गणेशपार आणि मोंढ्यात ठरलेली असायची. या शेवटच्या प्रचारसभेच्या नागरिकांची तुफान गर्दी होते असे. या सभेने शहरातील ‘हवा’च पलटून जायची आणि भाजपा-सेनेला यश हमखास मिळायचे. अपवाद ठरला ती नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणुकीची शेवटची सभा. यावेळी शेवटची प्रचार आ. पंकजा मुंडे यांनी घेतली राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे घेतली. गोपीनाथ मुंडे यांचे तडाखेबाज भाषण ऐकण्यासाठी प्रत्येक सभेला ग्रामस्थांची नागरिकांची विराट गर्दी व्हायची. परळी व परिसरातील ग्रामस्थांची मुंडे यांच्यावर अपार श्रद्धा होती. दवाखान्याचे उद्घाटन, दुकानांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हायचे. डॉक्टरही दवाखान्याच्या उद्घाटनाला मुंडे यांना बोलवायचे. मित्रांचे कौतुक आणि मार्गदर्शकाची प्रशंसा गोपीनाथ मुंडे परळीच्या खाजगी कार्यक्रमात आपल्याला कोणकोणत्या मित्रांनी व वडिलधार्‍यांनी कसे सहकार्य केले हे सांगायला विसरत नसत. पूनमचंद कुटील, पन्नालाल जैन, पी.डी. जोशी, सुखदेवराव मुंडे, दिनकर मुंडे, अशोक सामत अशा अनेक लोकांचा उल्लेख ते करायचे मनमुराद हसवायचे उद्घाटन असतो की जाहीर सभा असो, त्यामधुन उपस्थितांना मनमुराद हसवायचे त्याला दाद देत उपस्थित दाद देत असत. विरोधकांची खिल्ली ही चांगल्या प्रकारे उडवायचे आणि विरोधी पक्षातील चांगल्यांचे ही कौतुक करायचे, हा खा. मुंडे यांचा मूळ स्वभाव. लहान असो वृद्ध सर्वांना भेटायचेच गोपीनाथ मुंडे परळीतील ‘यशश्री’ बंगल्यावर सकाळी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांला भेटायचे, बोलायचे. आपुलकीने त्यांची विचारपूस करायचे. जोपर्यंत भेटणारे लोक आहेत त्या सर्वांना ते भेटायचे. मुलगी पंकजावर सोपवायचे धुरा गेल्या तीन वर्षापासून लग्न समारंभ, उद्घाटने, लोकांच्या गाठी-भेटींची जबाबदारी मुलगी पंकजावर सोपवित होते. परळीत आले की ते आपल्या कुटुंबासह वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात जायचे. तत्पूर्वी दोन मिनिट मंदिराच्या कार्यालयात जाऊन विश्वस्तांशी चर्चा करायचे. शेवटच्या सभा बीड: लोकसभा निवडणुकीत प्रचार थांबला त्यादिवशी गोपीनाथराव मुंडे यांनी बीडच्या माळीवेस भागात शेवटची सभा घेतली. त्यानंतर मंत्री झाल्यावर मुंडे रविवारी भगवानगडावर आले होते. तेथे त्यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, यावेळी त्यांचा सत्कार झाला. त्यांचे भाषणही झाले होते. मंगळवारी औरंगाबादसह बीडमध्ये त्यांचे कार्यकर्ते होते. (प्रतिनिधी)