१४४ उमेदवारांची अंतिम निवड
By Admin | Updated: July 5, 2014 00:34 IST2014-07-04T23:34:29+5:302014-07-05T00:34:20+5:30
परभणी : जून महिन्यापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलिस भरतीचा अंतिम निकाल जाहीर करीत सामाजिक व समांतर आरक्षणानुसार १४४ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
१४४ उमेदवारांची अंतिम निवड
परभणी : जून महिन्यापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलिस भरतीचा अंतिम निकाल जाहीर करीत सामाजिक व समांतर आरक्षणानुसार १४४ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
पोलिस दलातील १४४ पदांसाठी ६ जूनपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. कागदपत्र तपासणी, मैदानी कौशल्य आणि लेखी परीक्षा अशा तीन टप्प्यात ही प्रक्रिया पार पडली. १ हजार १९३ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. त्यात लेखी आणि मैदानी चाचणीमधील गुणवत्तेनुसार १४४ निवड करण्यात आली. १८४९ उमेदवारांची निवड होऊ शकली नाही. या प्रक्रियेत आरक्षणानुसार सर्वसाधारण गटातून ५७, महिला गटातून ४४, खेळाडू गटातून ७, प्रकल्पग्रस्त ७, भूकंपग्रस्त २, माजी सैनिक १७, अंशपदवीधर ५ आणि गृहरक्षक दल गटातून ५ अशा १४४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीत परभणी येथील पोलिस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर त्याचप्रमाणे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील आणि अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही अनुचित प्रकार न होता पारदर्शक पद्धतीने पार पडली.
मागील एक महिन्यापासून जिल्हा पोलिस दलात ही भरती प्रक्रिया सुरू होती. ही भरती प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी वेळोवेळी पोलिस प्रशासनाने उमेदवारांना आवाहन केले होते. उमेदवारांनी भूलथापांना बळी पडू नये. कुठे काही प्रकार आढळल्यास प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले होते. पोलिस प्रशासनाने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या होत्या. भरतीच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.