शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा साठा जप्त

By admin | Updated: October 8, 2014 01:06 IST

औरंगाबाद : ऐन सणासुदीच्या काळात आधीच घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई भासत आहे.

औरंगाबाद : ऐन सणासुदीच्या काळात आधीच घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई भासत आहे. अशा परिस्थितीत काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी बीडहून आणण्यात आलेला घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा साठा गुन्हे शाखा पोलिसांनी चिकलठाण्याजवळ सापळा रचून पकडला. पन्नास गॅस सिलिंडरसह एक जीप पोलिसांनी जप्त केली असून हे सिलिंडर आणणाऱ्या अनिल रमणलाल चुडीवाल (३२, रा. बायजीपुरा) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, एमएच- २०, डीई- १२३६ या क्रमांकाच्या बोलेरो जीपमध्ये बीडहून घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा साठा आणण्यात येत आहे. हे सिलिंडर औरंगाबादेत काळ्याबाजारात विकण्यात येणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे फौजदार गिरिधर ठाकूर यांना खबऱ्याकडून मंगळवारी मिळाली. माहिती मिळताच फौजदार ठाकूर, रणजितसिंह राजपूत, प्रदीप गोमटे, दत्तू सांगळे, अप्पासाहेब खिल्लारी, शेख नबाब यांनी सकाळी जालना रोडवर चिकलठाण्याजवळ सापळा रचला. सोबत पुरवठा विभागाच्या पथकालाही घेण्यात आले.सकाळी साडेअकराच्या सुमारास बीडकडून खबऱ्याने सांगितलेल्या क्रमांकाची जीप येताना पोलिसांच्या नजरेस पडली. जीपमध्ये गॅसचे सिलिंडरही होते. पोलिसांनी ही जीप अडविली. चालक अनिल चुडीवाल याला ताब्यात घेतले. त्याला ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच हे सिलिंडर काळ्याबाजारात विक्रीसाठी आपण आणले होते, अशी कबुली त्याने दिली. त्यावरून आरोपी चुडीवाल याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातील जीप व ५० सिलिंडर जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.