शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

लाखो मराठा बांधव सभेसाठी अंतरवालीकडे; सोलापूर-धुळे महामार्ग जाम, हे पर्यायी मार्ग वापरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 11:27 IST

एक मराठा लाख मराठा,लाखों मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे, धुळे- सोलापूर महामार्ग जाम

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटी (रामगव्हाण रस्ता) येथील आजच्या मराठा आरक्षणाच्या संबोधन सभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सोलापूर-धुळे महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. सभेला राज्यभरातून लाखो समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच धुळे-सोलापूर महामार्ग सभेकडे जाणाऱ्या वाहनांनी जाम झाला आहे.  वाहनधारक बीड आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ते वापरत आहेत.  

सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात होईल. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई भागातून जवळपास लाखो समाजबांधव या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सभेचे ठिकाण धुळे-साेलापूर महामार्ग (क्रमांक ५२) लगत असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या महामार्गावरील इतर जड वाहनांची वाहतूक शुक्रवारी रात्री १० ते शनिवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंद राहील. या दरम्यान जड वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

भालगाव फाट्यापासूनच ट्राफिक जामधुळे- सोलापूर महामार्गावर सर्व गाड्या मनोज जरांगे पाटलांच्या सभेला जाणाऱ्या आहेत. जागोजागी चहा, नाष्टाची सोय करण्यात आली आहे. पाचोड येथील टोल सभेसाठी येणाऱ्या गाडयासाठी बंद करण्यात आला आहे.तसेच पाचोड टोलनाक्यापासूनच सोलापूर-धुळे महामार्गावर केवळ सभेसाठी जाणाऱ्यांची दिसून येत आहे. वडीगोदरीपासून अलीकडेच सहा किलोमीटर सर्व गाड्या थांबवल्या आहेत. सभेचे मैदान आणि पार्किंगसह सगळे हाऊसफुल झाले आहे.

असा असेल पर्यायी मार्गछत्रपती संभाजीनगर -बीडकडे जाणारी वाहतूक-छत्रपती संभाजीनगर, बिडकीन, पैठण, मुुंगी, बोधेगाव, पारगाव, पाडळ सिंगीमार्गे, बीडकडे जाईल.-छत्रपती संभाजीनगर-कचनेर कमान, बिडकीन, पैठण, मुंगी, बोधेगाव, पारगाव, पाडळसिंगीमार्गे बीडकडे जातील.

बीड पाचोडमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहतूक-बीड, पाडळसिंगी फाटा, पारगाव, बोधेगाव, पैठण, बिडकीनमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येईल.

छत्रपती संभाजीनगर ते बीडकडे जालनामार्गे जाणारी वाहतूक-छत्रपती संभाजीनगर, बदनापूर, जालना, घनसावंगीमार्गे बीडकडे जाईल.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादJalanaजालना