शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

तलाव, बंधाऱ्यांची कामे झाली मंजूर

By admin | Updated: December 23, 2015 23:36 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत अखेर लघुसिंचन विभागाच्या पाझर तलाव व सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत अखेर लघुसिंचन विभागाच्या पाझर तलाव व सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मागील काही बैठकांमध्ये हा मुद्दा केवळ चर्चेतच येत होता.अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते होत्या. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, सभापती अशोक हरण, शोभाबाई झुंझुर्डे, सहेल्याबाई भोकरे आदींची उपस्थिती होती. या सभेत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामाबाबतही चर्चा झाली. त्यानंतर सर्वानुमते लघुसिंचन विभागाचा आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये लघुपाटबंधारे लेखाशीर्षात २३२ लाखांचे जुने दायित्व दिल्यानंतर ५४.५७ उरले होते. त्याच्या दीडपट नियोजनात कळमनुरी तालुक्यातील घोडा-४८ लाख, औंढा तालुक्यातील अंजनवाडा-४५ लाख असे दोन तलाव मंजूर केले आहेत. आदिवासी उपयोजनेतही एक पाझर तलाव औंढा तालुक्यातील भोसी क्र.२ ला ४८ लाखांची मान्यता दिली आहे. तसेच हिंगोली तालुक्यातील मौजा येथे सिमेंट बंधाऱ्याचे नियोजन केले. यासाठी ४८ लाखांच्या दीडपट म्हणजे ७२ लाखांचे नियोजन केले आहे.कोल्हापुरी बंधारे सर्वसाधारणमध्ये नियोजनासाठी ११९ .५८ लक्ष उपलब्ध होते. त्याच्या दीडपट १७९ लाखांचे नियोजन केले. यात वसमत तालुक्यातील हयातनगर, कानोसा, हट्टा, औंढा ना. तालुक्यात रामेश्वर, शिरडशहापूर, पुरजळ क्र.१ व २, कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा, देवजना, पाळोदी, हिंगोली तालुक्यात आडगाव, सेनगाव तालुक्यात वरूड चक्रपान, पळशी येथे कोल्हापुरी बंधाऱ्यास मान्यता दिली आहे. तर आदिवासी उपययोजनेत कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी, तोंडापूर क्र.१, २, वारंगा, कुंभारवाडी त. चाफनाथ, धानोरा, हिंगोलीत करंजाळा, औंढ्यात वाळकी येथे कोल्हापुरी बंधारा मंजूर झाला.यामध्ये दायीत्व देवून उरलेल्या ७१.७८ लाखांच्या दीडपट नियोजन केले.(प्रतिनिधी)