शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एन्काउंटर होण्याच्या काही तांस आधीच खोतकर बहीण-भावाची सोन्याच्या पैशातून जमीन खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:44 IST

लग्न ठरलेल्या दिवशीच रोहिणी खोतकरची हर्सूल कारागृहात रवानगी, गोव्यातून मित्र ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यातील दरोडा प्रकरणात मुख्य आरोपी तथा एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरने सोने विकून पडेगावमध्ये ९ लाखात जमीन खरेदी केली होती. २६ मे रोजी एन्काउंटर होण्याच्या दिवशीच हा व्यवहार केला. जमीन बहीण रोहिणी खोतकरच्या नावे केली. रोहिणीच्या पोलिस कोठडीदरम्यान या व्यवहारातील ९ लाख रुपये जप्त केले असल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

लड्डा विदेशात असताना १५ मे रोजी त्यांच्या घरी दरोडा पडला. यात ५.५ किलो सोने, ३२ किलो चांदी लुटण्यात आली. गुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली. दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल २६ मे रोजी साजापूर शिवारात सहायक निरीक्षक रविकांत गच्चे यांच्यासोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. दरोड्यापासून ते एन्काउंटरपर्यंत अमोल मैत्रिण खुशीच्या सोबतच होता. सोने विकलेले ठिकाण, पैशांचा व्यवहार, लपवलेल्या चांदीपासून ते खरेदी केलेल्या जमिनीबाबत प्रत्येक गोष्ट तिला माहीत होती. त्यामुळे खुशीच्या सखोल चौकशीतून हा घटनाक्रम उलगडत गेला. अमोल, रोहिणीने पडेगावमध्ये रेल्वे रुळाजवळ प्लॉटचा ९ लाखांत व्यवहार ठरवला होता. २६ मे रोजी दुपारी अमाेलच्या उपस्थितीत प्लॉट मालकाला ९ लाख रुपये देऊन कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. त्यावेळी खुशीदेखील उपस्थित होती. यात रोहिणीची भूमिका ही गुन्ह्याला पाठिंबा दिल्याचे सिध्द झाल्याने २४ जून रोजी तिला अटक करण्यात आली.

लग्नाच्या तारखेला कारागृहातचौकशी सुरू असतानाच रोहिणी १८ जून रोजी मोबाइल बंद करून गोव्याला मित्र रणजीतला भेटण्यासाठी गेली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला होता. २३ जून रोजी परत येऊन तिने प्लॉट खरेदी रद्द करत मालकाला पैसे परत मागितले होते. तोपर्यंत पोलिसांनी तिला अटक केली. मूळ बंगळुरूचा असलेला रणजीत गोव्यात कॅसिनोमध्ये नोकरी करतो. ऑक्टोबर २०२४मध्ये राेहिणीची त्याच्याशी गाेव्यात ओळख झाली होती. तिने त्याच्यासोबत लग्न करण्याचेही ठरवले होते. २६ जून रोजी लग्नाची तारीख ठरली होती. मात्र, त्याच दिवशी तिची हर्सूल कारागृहात रवानगी झाली. आवश्यकता वाटल्यास तिच्या उर्वरित पोलिस कोठडीचा हक्क राखीव ठेवत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची मागणी शुक्रवारी पोलिसांनी केली.

मित्राची कसून चौकशीगुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी गोव्यातून रोहिणीचा मित्र रणजीतला ताब्यात घेतले. शुक्रवारी त्याची दोन पथकांनी कसून चौकशी केली. रोहिणीने त्याला अनेक गोपनीय माहिती सांगितल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर